आता रिलायन्स जिओची 'ट्राय'कडे तक्रार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

ग्राहकासाठी...

रिलायन्स जिओ आपला ग्राहकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी अजूनही नियमाला धरून नसणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यास भुरळ घालत आहे, असा आरोप इतर कंपन्यांकडून जिओवर केला जातो आहे.

अर्थविषयक बातम्यांसाठी वाचा mail sakalmoney.com

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने ऑफर बंद केल्या तरी इतर दूरसंचार कंपन्यांमधील 'डेटा युद्ध' अद्यापही सुरूच आहे. जिओकडे अधिक नवीन ग्राहक जाऊ नयेत, यासाठी या कंपन्यांनी षड्‌यंत्र रचल्याचा दावा जिओने केला आहे.

दूरसंचार क्षेत्रात पोर्टेबिलिटी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक एक नेटवर्क बदलून दुसऱ्या नेटवर्कची सेवा घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र जे ग्राहक त्यांचे नेटवर्क सोडून जिओकडे येऊ इच्छितात त्यांना ही सेवा उपलब्ध करून दिली जात नसल्याचे जिओने ट्रायकडे केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. जिओने केलेले दावे खोटे असल्याचे सांगून इतर टेलिकॉम कंपन्यांनी ते फेटाळून लावले आहेत.

ग्राहकांचा ओढा जिओकडे वाढल्याने दिवसेंदिवस आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेलच्या ग्राहकांमध्ये घसरण होत आहे. रिलायन्स जिओ आपला ग्राहकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी अजूनही नियमाला धरून नसणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यास भुरळ घालत आहे, असा आरोप इतर कंपन्यांकडून जिओवर केला जातो आहे.

आता मात्र जिओनेदेखील एअरटेल, व्होडाफोन, आयडियाविरोधात ट्रायकडे धाव घेतली आहे. जिओची ग्राहक संख्या वाढत आहे. त्याचमुळे पोर्टेबिलिटीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Jio seeks Trai action against Airtel, Vodafone, Idea for violating rules