रिलायन्सकडून डिजीटल क्रांती; 15 ऑगस्टपासून नवा फोन

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

रिलायन्स समूहाच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) सर्वसामान्यांवर घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. जिओतर्फे आता नवीन फोन, सेट टॉप बॉक्स आणि गीगा टिव्हीची घोषणा करण्यात आली.
 

मुंबई : रिलायन्स समूहाच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) सर्वसामान्यांवर घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. जिओतर्फे आता नवीन फोन, सेट टॉप बॉक्स आणि गीगा टिव्हीची घोषणा करण्यात आली.
 
जिओ फोन 2 लॉन्च 
जिओच्या फोनसंबंधी नवीन घोषणा करण्यात आली. जिओच्या 1500 रुपयाला मिळणाऱ्या फिचर फोनमध्ये युट्युब, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या तीनही सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. या तीनही अॅप्सचा अॅन्ड्रॉईड आणि आयओएस सारखाच अनुभव  आता जिओच्या फिचर फोनमध्ये घेता येणार आहे.  तसेच 15 ऑगस्टला जिओ फिचर फोनचे अपग्रेडेड व्हर्जन 'जिओ फोन2' या नावाने लॉन्च केले जाणार आहे ज्याची किंमत 2,999 निश्तित केली गेली आहे. या फोनमध्ये व्हॉईस कमांडची सुविधाही दिली जाणार आहे. 

जिओ गीगा टिव्ही
तसेच रिलायन्स समूहाकडून नवीन गीगा टिव्हीची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये एकाच बॉक्समध्ये जगभरातील 600 पेक्षा जास्त चॅनेल्स दिसणार आहेत. या टिव्हीमध्ये  व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आहे. तसेच हा टिव्ही व्हॉईस कमांडने वापरता येणार असूनच या टिव्हीच्या सहाय्याने कॉलिंग करता येणार आहे. रिलायन्स समूहाकडून या टिव्हीली जिओ गीगा फायबर असे नाव देण्यात आले आहे. 

जिओ अॅपद्वारे घरातील सर्व उपकरणे चालणार
तसेच जिओ स्मार्ट होम सोल्यूशनची सेवा 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. यामुळे घरातील फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणं जिओ अॅपद्वारे चालवता येतील. 

सध्या जिओ परिवाराशी भारतातील 22.5 कोटी नागरिक जोडले गेले असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. भारतातील सर्व खाजगी कंपन्यांमध्ये जिओने सर्वाधिक जीएसटी आणि कर भरला आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 20.6% वाढून 36,076 कोटी रुपयांवर पोहोचल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. येत्या काळात जिओ माध्यमं, मनोरंजन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Reliance launches new phone and Giga fiber TV