esakal | रिलायन्स राईट्स इश्यूला जबरदस्त प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

रिलायन्स राईट्स इश्यूला जबरदस्त प्रतिसाद

रिलायन्सचा राईट इश्यू20मे पासून खुला झाला असून 3जूनपर्यंत खुला राहणार आहे.या कालावधीत विद्यमान शेअरधारकांना राईट्स इश्यूमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.कंपनीने 14मे रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली होती.

रिलायन्स राईट्स इश्यूला जबरदस्त प्रतिसाद

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचा राईट्स इश्यूला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीचा इश्यू 1.1 टक्के "ओव्हरसबस्क्राईब' झाला आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रिलायन्सचा राईट इश्यू 20 मे पासून खुला झाला असून 3 जूनपर्यंत खुला राहणार आहे. या कालावधीत विद्यमान शेअरधारकांना राईट्स इश्यूमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीने 14 मे रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली होती. विद्यमान गुंतवणूकदारांना 15 शेअरमागे एक शेअर या प्रमाणात 1257 रुपयांना नवीन शेअर खरेदी करता येणार आहे. कंपनी राईट इश्यूच्या माध्यमातून सुमारे 53 हजार 125 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. या माध्यमातून एकूण 42 कोटी 26 लाख शेअरची विक्री करण्यात येणार आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे 25.4 लाख लहान गुंतवणूकदार (रिटेल शेअरहोल्डर) आहेत. तर 1700 संस्थात्मक गुंतवणूकदार (इन्स्टिट्युशनल) आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रिलायन्स राईट्स इश्यू गुंतवणूकदारांसाठी २० मेपासून खुला झाला होता. २० मे ते ३ जून या कालावधीत विद्यमान शेअरधारकांना राईट्स इश्यूमध्ये गुंतवणूक करता येणार होती. १४ मे पर्यंत ज्या गुंतवणूकदारांनी रिलायन्स कंपनीचे शेअर खरेदी केले आहेत अशा विद्यमान गुंतवणूकदारांना १५ शेअरमागे एक शेअर या प्रमाणात १२५७ रुपयांना नवीन शेअर खरेदी करता येणार होते. तब्बल ५३,१२५ कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीसाठी हा इश्यू बाजारात आणण्यात आला आहे.

राईट्स इश्यूचे स्वरूप
एकूण भांडवल उभारणी : ५३,१२४,२०,०५,७५८ रुपये
एकूण राईट्स इक्विटी शेअर : ४२,२६,२६,८९४

इश्यू ओपन होण्याची तारीख : २० मे २०२०
इश्यू बंद होण्याची तारीख : ३ जून २०२०
इश्यू अॅलॉटमेंट तारीख : १० जून २०२०
इश्यू क्रेडिट तारीख        : ११ जून २०२०
इश्यू लिस्टिंग तारीख :      १२ जून २०२०

loading image