‘रेनॉ’चे ४१५ हून अधिक सेल्स, सर्विस पॉइंट्‌स

वृत्तसंस्था
Thursday, 29 October 2020

या नव्या डीलरशिप मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, हरियाना, पंजाब, तेलंगण, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल येथे सुरू करण्यात आल्या आहेत.

पुणे - ‘रेनॉ इंडिया’ने देशभरात गेल्या दोन महिन्यांमध्ये ३४ नव्या सेल्स ॲण्ड सर्विस टचपॉइंट्‌सची घोषणा केली आहे. त्यामुळे वर्षभराहून कमी कालावधीत रेनॉने देशभरात सुरू केलेल्या नव्या सेल्स ॲण्ड सर्विस टचपॉइंट्‌सची संख्या ९० च्या पुढे गेली आहे. या नव्या डीलरशिप मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, हरियाना, पंजाब, तेलंगण, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल येथे सुरू करण्यात आल्या आहेत.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेनॉ इंडियाच्या या वृद्धीमुळे त्यांचे संपर्क जाळे ४१५ हून अधिक विक्री केंद्रे आणि ४७५ हून अधिक सर्विस टचपॉईंट्‌स असे वाढले आहे. यात विक्री आणि सेवेचा उत्कृष्ट दर्जा राखणाऱ्या देशभरातील २०० हून अधिक ‘वर्कशॉप्स ऑन व्हील्स’चाही समावेश आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘रेनॉ इंडियाचे अस्तित्व धोरणात्मकरित्या व्यापक केले जात आहे. ग्राहक आणि डीलर पार्टनर अशा दोहोंकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनपर प्रतिसादाचे हे प्रतीक आहे,’ असे रेनॉ इंडियाच्या सेल्स ॲण्ड नेटवर्कचे प्रमुख सुधीर मल्होत्रा यांनी सांगितले. सर्व उत्पादनांमध्ये सवलतींची घोषणा केली आहे. यात २२ हजार रुपयांपर्यंत खास अतिरिक्त सवलतीचा समावेश आहे. यामुळे, डस्टरवर ७० हजार, क्विडवर ४० हजार आणि ट्रायबर ३० हजार रुपये अशा विविध उत्पादनांवर असलेल्या आकर्षक सणासुदीच्या सवलतींमध्ये भर पडणार आहे. खरेदी अधिक सोपी व्हावी, यासाठी रेनॉने आकर्षक वित्तीय पर्यायही देऊ केले आहेत. रेनॉ इंडियाने नुकतीच २०२० क्विड नीओटेक एडिशन सादर केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Renault India announces 34 new sales and service touchpoints across the country