आणखी एका बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका; मुंबई परिसरात सर्वाधिक खातेदार

RBI-bank
RBI-bank

* सीकेपी बॅंकेच्या वाढत्या तोट्यामुळे रिझर्व्ह बॅंकेची कारवाई
* बॅंकेचे ११,००० पेक्षा जास्त ठेवीदार-गुंतवणूकदार
* बॅंकेचे १.२५ लाख खातेधारक
* ठेवीदार आणि खातेधारकांमध्ये चिंतेचे वातावरण

सीकेपी सहकारी बॅंकेचा परवानगा रिझर्व्ह बॅंकेने रद्द केला आहे. सीकेपी सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे आणि बॅंकेचे थकित कर्ज वाढत असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सीकेपी बॅंकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे सीकेपी बॅंकेच्या ठेवींदारांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री रिझर्व्ह बॅंकेने सीकेपी सहकारी बॅंकेचा परवाना रद्द केला आहे. यामुळे सीकेपी सहकारी बॅंकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे.

अर्थविश्व क्षेत्रातील इतर घडामोडींसाठी येथे  क्लिक करा  

सीकेपी बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे आणि बॅंकेच्या तोट्यात वाढ होत असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. खराब आर्थिक परिस्थिती आणि इतर कारणांमुळे बॅंक आपल्या ठेवीदारांचे सर्व पैसे परत करू शकेल की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बॅंकेचे ठेवीदार आणि ग्राहक त्यामुळे चितांतूर झाले आहेत. सध्या सीकेपी सहकारी बॅंकेचे ११,००० पेक्षा जास्त ठेवीदार-गुंतवणूकदार आणि १.२५ लाख खातेदार आहेत. या सर्वांमध्येच चिंतेचे वातावरण त्यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. 

सध्या असलेली बॅंकेची आर्थिक स्थिती पाहता बॅंकेचे पुनरुथ्थान होणे अवघड असल्याचे म्हटले जाते आहे. याशिवाय बॅंकेची ४८५ कोटी रुपयांची मुदतठेवदेखील कर्जाच्या विळख्यात अडकली असल्याची माहिती एका इंग्रजी संकेतस्थळावरून समोर येते आहे. याआधी रिझर्व्ह बॅंकेने सीकेपी सहकारी बॅंकेच्या कामकाज आणि विविध सेवांवर अनेक बंधने घातली होती. बॅंकेतील ठेवी काढण्यासंदर्भात २०१४ पासून बंधने लागू करण्यात आलेली आहेत. बॅंकेची निव्वळ मालमत्ता घटत असल्यामुळे आणि बॅंकेच्या तोट्यात वाढ झाल्यामुळे बॅंकेच्या व्यवहारांवर बंधने घालण्यात आली होती किंवा काही व्यवहारांना बंदी घालण्यात आलेली होती. 

अर्थात यावर्षी बॅंकेने आर्थिक कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता. बॅंकेने आपल्या निव्वळ मालमत्तेत वाढ करून ती २३० कोटी रुपयांवर आणली होती. २०१६ मध्ये सीकेपी सरकारी बॅंकेची निव्वळ मालमत्ता १४६ कोटी रुपयांपर्यत घसरली होती. बॅंकेला कार्यान्वित नफा मिळाला होता. मात्र बॅंकेच्या निव्वळ मालमत्तेत घट होत असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सीकेपी सहकारी बॅंकेचे मुख्यालय मुंबईत दादर येथे आहे. मागील वर्षी मे महिन्यात सीकेपी बॅंकेच्या १.५० लाख ठेवींदार आणि खातेधारकांनी,  बॅंकेच्या पुनरुथ्थानासंदर्भात आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत मागितली होती. या सर्वांनी पंतप्रधान मोंदीकडे यासंदर्भात धाव घेतली होती. सीकेपी सहकारी बॅंक लि. ही सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील मुंबईतील आघाडीची बॅंक आहे. सीकेपी बॅंकेची स्थापना १९१५ मध्ये झाली होती. ही मुंबईतील सर्वात जुन्या सहकारी बॅंकांपैकी एक बॅंक आहे. बॅंकेच्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मिळून ८ शाखा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com