बिगर बॅंकिंग कंपन्यांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

मुंबई - बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग वित्तसंस्थांवर (एनबीएफसी) रिझर्व्ह बॅंकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. 

बॅंकेने 31 "एनबीएफसी'ची नोंदणी रद्द केली असून यातील सर्वाधिक 27 कंपन्या पश्‍चिम बंगालमधील आहेत. देशभरात जवळपास 12 हजार एनबीएफसी कंपन्या आहेत. विविध योजनांमधून या कंपन्या ग्राहकांकडून ठेवी स्वीकारतात; मात्र गेल्या काही वर्षांत गुंतवणूक योजनांमधून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून या कंपन्यांचा ठराविक कालावधीत आढावा घेतला जातो. नुकतीच रिझर्व्ह बॅंकेने 31 कंपन्यांची नोंदणी रद्द केली. यातील 27 कंपन्या पश्‍चिम बंगाल आणि चार कंपन्या उत्तर प्रदेशातील आहेत. "आयएल अँड एफएस' या सरकारी कंपनीच्या आर्थिक संकटानंतर एनबीएफसी क्षेत्रात रोकडटंचाई तीव्र झाली आहे. या छोट्या कंपन्यांना पतपुरवठा वाढवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून प्रयत्न केले जात आहेत. 

Web Title: Reserve Bank of India on non-banking companies