Retail inflation : महागाईने ओलांडली RBI ची 'लक्ष्मण रेखा'; किरकोळ चलनवाढीचा दर उच्चांकीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

inflation

Retail inflation : महागाईने ओलांडली RBI ची 'लक्ष्मण रेखा'; किरकोळ चलनवाढीचा दर उच्चांकीवर

Retail inflation 2023 : जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सर्व सामान्यांवर मगाईचा बोजा पुन्हा एकदा वाढला आहे. 

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सरकारने सोमवारी CPI वर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. जाहीर करण्यात आलेलील ही आकडेवारी RBI च्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे.

जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा साडेसहा टक्क्यांच्या पुढे गेला असून, जानेवारीमध्ये किरकोळ महागाई दर 6.52 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.

हाच दर डिसेंबर 2022 मध्ये 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता. किरकोळ महागाईच्या दरातील ही वाढ तीन महिन्यातील सर्वोच्च उच्चांकीवर आहे.

जानेवारीमध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.94 टक्क्यांवर पोहोचला असून, डिसेंबर 2022 हाच दर 4.19 टक्के होता. 

रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दर ४ टक्के ठेवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याचबरोबर महागाईची व्याप्ती २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची मर्यादा आहे.

टॅग्स :moneyinflation