esakal | सोने खरेदीची हीच योग्य वेळ; दसऱ्याला सुवर्ण संधी | Gold
sakal

बोलून बातमी शोधा

gold

सोने खरेदीची हीच योग्य वेळ; दसऱ्याला सुवर्ण संधी

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : सोन्याच्या दरातील चढउतार कायम आहे. दसऱ्यापूर्वीच सोने स्वस्त झाल्याने सोने खरेदीची मोठी संधी निर्माण झाली आहे. बुधवारी सोन्याचे दर पुन्हा कमी झाल्याने दसऱ्याला सोने खरेदीला उधाण येण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

बुधवारी शहरात सराफा बाजारात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी दहा ग्रॅममागे ४७ हजार ७०० रुपये नोंदविले गेले. सराफा बाजारात गेल्या महिन्यापासून सोन्याच्या दरात चढउतार बघावयास मिळत आहेत. सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे ४७ हजार ३०० रुपये इतके होते. चांदी दरही किलोमागे ६२ हजार ८०० रुपयांवर स्थिरावलेला आहे. सध्या सोन्याचे दर कमी झाल्याने सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

सराफा व्यापाऱ्यांचे लक्ष येणाऱ्या दसरा सणाकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत.

हेही वाचा: नुसता दुधाचा चहा पिताय? जाणून घ्या होणारे नुकसान

दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सतत वाढ झाल्याचे पूर्वीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी सोन्याच्या किमती वाढणार असल्याचा अंदाज बहुतांश जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. पुढच्या ३ ते ५ वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या ५ वर्षांत १० ग्रॅम सोन्याचा दर ८५ हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत आहेत. अशात सोने खरेदीची हीच योग्य वेळ आहे.
loading image
go to top