esakal | "इक्विटी'त गुंतवणूक योग्य आहे?
sakal

बोलून बातमी शोधा

"इक्विटी'त गुंतवणूक योग्य आहे?

बाजारातील जोखीम आणि बाजारातील स्थिती यांचा विचार न करता भूतकाळातील परतावा भविष्यातही मिळेल हा विचार ते करतात.यामुळे काळानुसार चांगला परतावा नेमका काय आणि किती याचा विचार करावा

"इक्विटी'त गुंतवणूक योग्य आहे?

sakal_logo
By
ऋषभ पारख

कोरोनाच्या संकटाआधी "इक्विटी'त गुंतवणूक. मग, ती शेअर बाजारातील असो वा म्युच्युअल फंडमधील. यातून मिळणारा दीर्घकालीन परतावा हा चांगला होता. मात्र, सध्याचे चित्र बघितल्यास हा परतावा कमी झालेला दिसतोय. आकडेवारीचा विचार करायचा झाल्यास सेन्सेक्सचा वार्षिक वृद्धीदर (कंपाउंडेड ऍन्यूअल ग्रोथ  रेट- सीएजीआर) दहा वर्षांत सुमारे 6.5 टक्के आहे. गेल्या दहा वर्षांतील महागाई दरापेक्षा तो कमी आहे. याचाच अर्थ असा की, गेल्या दहा वर्षात 'इक्विटी'ने तुमचे महागाईपासून संरक्षण केलेले नाही. अशाच प्रकारचा पॅटर्न तुमची  "सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन"मध्येही (एसआयपी) दिसतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अतिशय कमी कालावधीत आणि जलद गतीने अशाप्रकारे होणारी मोठी घसरण तुमच्या दिर्घकाळातील गुंतवणुकीच्या मूल्यावर परिणाम करू शकते. मात्र, याचा अर्थ असा नाही की दिर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक ही योग्य नाही अथवा तुम्ही इक्विटी मार्केट, म्युच्युअल फंडातील  "एसआयपी'वर अवलंबून राहू नये. तर, मग तुम्ही या बाबी तपासायला सुरुवात करा.

 म्युच्युअल फंड योग्य आहे का?, इक्विटी योग्य आहे का?, एसआयपी योग्य आहे का? दीर्घकालीन गुंतवणूक केवळ एक मिथक आहे का? तर याचे उत्तर आहे की, म्युच्युअल फंड अथवा इक्विटी याचबरोबर सोने, मालमत्ता अथवा "फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट' हे सर्वच गुंतवणूक प्रकार योग्य आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फक्त तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आणि अयोग्य याचा विचार करून निर्णय घ्या.

सध्याच्या परिस्थितीत काय करावे?
बाजार कोसळत असताना नफा मिळवण्यासाठी आणि तुमचे दीर्घकालीन उद्दिष्ट गाठण्यासाठी "स्ट्रॅटेजी' आखा.

- "इक्विटी'मधील तुमचा अपेक्षित परतावा पुन्हा निश्चित करा?
सध्या जाणवणारी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे "इक्विटी'मधील गुंतवणुकीशी न जुळणारी अपेक्षा होय. बाजारातील जोखीम आणि बाजारातील स्थिती यांचा विचार न करता भूतकाळातील परतावा भविष्यातही मिळेल हा विचार ते करतात. यामुळे काळानुसार चांगला परतावा नेमका काय आणि किती याचा विचार करावा. तुम्हाला "फिक्स डिपॉझिट'मधून सध्या 10 ते 12 टक्के परतावा मिळत नाही. तो सध्या 5 ते 6 टक्क्यांवर आला आहे. याच प्रकारे "इक्विटी म्युच्युअल फंडा'तून 20 ते 30 टक्के परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. रास्त अपेक्षा म्हणजे महागाई आणि जोखीम गृहित धरून "इक्विटी इन्व्हेस्टमेंट"मधून किती चांगला परतावा मिळतो हे पाहावे.

- जास्त जोखीम म्हणजे जास्त परतावा का?
नाही, गुंतवणूकदाराने जास्त जोखीम म्हणजे जास्त परतावा ही विचारसरणी सोडून द्यावी. प्रत्यक्षात त्याने जास्त जोखीम म्हणजे जास्त परतावा मिळण्याची हमी नव्हे तर शक्यता असते, हे समजून घ्यावे. प्रत्येक "ऍसेट क्लास'मध्ये जोखीम असते आणि "इक्विटी'मध्ये ती जरा अधिक असते. तुम्ही अविचाराने नव्हे, तर विचारपूर्वक घेतलेली जोखीम बाजारातून तुम्हाला अधिक परतावा मिळवून देऊ शकते.

बाजाराने गाठलेला तळ किंवा संभाव्य बाजाराच्या तळाबाबत फक्त दोन जण सांगू शकतात. एक म्हणजे थेट देव आणि दुसरा म्हणजे खोटारडा माणूस. यातील समस्या म्हणजे तुम्ही देवाशी बोलू शकत नाही आणि खोटारड्या माणसावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे नेमकी किती घसरण होईल हे सांगता येत नाही. बाजार वर्ष 2008 मध्ये सुमारे 60 टक्के कोसळला होता. त्यावेळी सुमारे 14 महिन्यांचा काळात बाजाराने तीन वेळा तळ पाहिला होता. बाजार कोसळल्यानंतर तुमच्या दीर्घकालीन एसआयपी परताव्यावर परिणाम होऊ शकतो. परंतु, या आधारावर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये प्रवेश करणे अथवा बाहेर पडणेही चांगली नसते.

- प्रत्येक घसरणीनंतर खरेदी करावी का?
आता पुन्हा तुम्ही गोंधळून जाऊ नका. प्रत्येक घसरणीनंतर बाजारात उपलब्ध असलेले स्वस्त शेअर खरेदी करणे असा याचा अर्थ नाही. गुणवत्ता आणि स्वस्त असलेले शेअर तुम्ही खरेदी करू शकता. मात्र, लक्षात ठेवा की सध्या आकर्षक आणि स्वस्त दिसत असलेले शेअर भविष्यकाळात स्वस्तच राहू शकतात आणि अनाकर्षकही होऊ शकतात.

-  "ऍसेट अॅलोकेशन' रणनीतीवर भर द्या 
चांगले  'ऍसेट अॅलोकेशन' असणे हा संपत्ती निर्माण करण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही जोखीम निश्चित करून "इक्विटी'सह सोने, रिअल इस्टेट अथवा "फिक्स्ड इन्कम ऑप्शन्स'पैकी कशात गुंतवणूक करायची याचा निर्णय घेऊ शकता. त्यामुळे बाजार जरी पडला असला तरी तुमचे "इक्विटी अॅलोकेशन' कमी असल्याने तुम्हाला काळजी करण्याची गरज राहत नाही. तुम्ही उद्दिष्टे गाठण्यासाठी नियोजन करण्यावर भर द्या. 

 म्युच्युअल फंड अथवा "इक्विटी'तील गुंतवणूक चांगली आहे. प्रत्येक "ऍसेट  क्लास' हा चांगला असतो. तो तुमच्यासाठी योग्य अथवा अयोग्य आहे का हे प्रत्येकाने तपासून घेतले पाहिजे.

लेखक गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत.