म्युच्युअल फंडाकडून तुमच्या अवास्तव अपेक्षा आहेत? 

ऋषभ पारख 
Monday, 12 October 2020

तुम्ही व्यवसाय अथवा शेअरमध्ये गुंतविलेला पैसा बुडेल, तरेल अथवा वाढेल. या दोन स्रोतांमधून तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यावर कोणतीही मर्यादा असणार नाही. फक्त यात तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल.’ 

व्यावसायिकांना पैसे कसे कमवायचे, हे सांगण्याची गरज नसते. असेच एक व्यावसायिक जिनेश पटेल यांच्याशी गुंतवणुकीबाबत मी संवाद साधला. 

पटेल म्हणाले, ‘वार्षिक २० ते २५ टक्के परतावा मिळवून देऊ शकतील असे म्युच्युअल फंड सुचवा.’ 

‘म्युच्युअल फंडावर तुम्ही २० ते २५ टक्के परतावा का गृहीत धरीत आहात?’ माझा प्रश्न. 

‘थेट शेअर बाजारात अथवा माझ्या स्वत:च्या व्यवसायात गुंतवणूक करून मला चांगला परतावा मिळतो. म्हणून म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीतूनही मला हीच अपेक्षा आहे.’ 

‘शेअर बाजारातील परतावा अथवा व्यवसायातील फायदा यांची तुलना म्युच्युअल फंडाच्या परताव्याशी होऊ शकत नाही.’ माझे स्पष्टीकरण. 

‘मग, म्युच्युअल फंडाकडून कोणत्या अपेक्षा ठेवायला हव्यात?’ 

‘तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आपण तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरवूया. तुम्ही व्यवसाय अथवा शेअरमध्ये गुंतविलेला पैसा बुडेल, तरेल अथवा वाढेल. या दोन स्रोतांमधून तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यावर कोणतीही मर्यादा असणार नाही. फक्त यात तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल.’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझ्या बोलण्याने पटेल काहीसे गोंधळले. ते म्हणाले, ‘तुम्हाला असे म्हणायचे आहे का, मी शेअर बाजारात गुंतवणूक करू नये? अथवा म्युच्युअल फंडामधील परताव्याची माझी अपेक्षा कमी करावी?’ 

‘निश्चितच नाही! मी केवळ तुमच्या अपेक्षा योग्य असाव्यात, असे म्हणत आहे. तुम्हाला म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीतून २० ते २५ टक्के परतावा हवा असेल, तर तुम्ही ‘मिड-कॅप’, ‘स्मॉल-कॅप’ अथवा ‘सेक्टरल फंड्स’मध्ये गुंतवणूक करा. अशा फंड्समध्ये रिस्क मोठी असते. तुम्ही व्यावसायिक आहात आणि शेअर बाजारातही गुंतवणूक करीत आहातच. मग तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणुकीतही मोठी रिस्क कशाला हवीय? मी तुम्हाला ‘इंडेक्स’, ‘लार्ज-कॅप’ अथवा ‘मल्टी-कॅप’ फंडात गुंतवणूक करण्यास सुचवेन. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता नजीकच्या काळात २० ते २५ टक्के परताव्याची अपेक्षा करणे वास्तववादी ठरणार नाही.’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या त्यांच्या योजनेसाठी मी त्यांना काही टिप्स दिल्या, त्या पुढीललप्रमाणे - 

१. डायव्हर्सिफिकेशनसाठी म्युच्युअल फंडाचा वापर करा. तुमची सर्वाधिक गुंतवणूक तुमच्या व्यवसायात, तसेच रिअल इस्टेटमध्ये असते. 

२. तुमच्या बचतीतील किमान ७० ते ७५ टक्के पुन्हा तुमच्या व्यवसायात गुंतवा आणि तुमच्या व्यवसायाचे मूल्य वाढविण्यावर भर द्या. 

३. उरलेले २५ ते ३० टक्के इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतविण्यासाठी वापरा. ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’चा (एसआयपी) वापर करून तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही बचत असेल, असे ठरवा. 

४. तुमच्याकडील ३० ते ४० टक्के इर्मजन्सी फंड म्हणून प्युअर लिक्विड फंडामध्ये गुंतवा. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

५. मासिक गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’ पद्धतीचा वापर करा आणि मोठ्या गुंतवणुकीसाठी ‘सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन’चा (एसटीपी) वापर करा. 

६. तुम्हाला किमान सात वर्षांपर्यंत पैसे ठेवता येत नसल्यास इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू नका. 

७. तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता नसल्यास शेअर बाजारात गुंतवणूक वाढवू नका. सध्याच्या कोविड-१९ महासाथीच्या काळात अधिक खबरदारी घ्या. 

८. तुमच्याकडे अतिरिक्त पैसा असेल, बाजाराची माहिती असेल आणि कायम लक्ष ठेवता येत असेल तरच तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेअर बाजारात गुंतवणूक करा. याचबरोबर तुमच्या व्यवसायावरील लक्ष विचलित होऊ नये, याचीही खबरदारी घ्या. 

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आणि गुंतवणूक सल्लागार आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rishabh parakh article about expectations from a mutual fund