आर्थिकदृष्ट्या ‘फिट’ राहा 

रोशन थापा 
Monday, 22 June 2020

अनेकांवर नोकरी गमावण्याची आणि वेतन कपातीची वेळ आली आहे. अनपेक्षितपणे ओढवलेल्या या परिस्थितीमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ही परिस्थिती कायमस्वरूपी राहणार नसली, तरी ती सुधारण्यास वेळ लागेल. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत. उत्पादन आणि पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांवर नोकरी गमावण्याची आणि वेतन कपातीची वेळ आली आहे. अनपेक्षितपणे ओढवलेल्या या परिस्थितीमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ही परिस्थिती कायमस्वरूपी राहणार नसली, तरी ती सुधारण्यास वेळ लागेल. आपल्या खिशाला कोरोनाच्या संसर्गाचा फटका बसू नये म्हणून खालील उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१) पैशाची रोखता तपासा 
संकट काळात आर्थिक चणचणीचा सामना करण्यासाठी आपल्याकडे पुरेशा पैशाची उपलब्धता असावी. किमान तीन महिन्यांचा ‘इमर्जन्सी फंड’ आवश्यक आहे. परंतु, तुम्ही अजून ‘इमर्जन्सी फंड’च तयार केला नसल्यास सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या (एसटीपी) माध्यमातून तो तयार करता येईल. हा फंड कसा तयार करावा किंवा त्याला कशा पद्धतीने अद्ययावत करावे यासाठी ‘सकाळ मनी’चे अनुभवी गुंतवणूक सल्लागार तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. 

२) उज्ज्वल भविष्यासाठी तरतूद 
‘लिक्विडीटी मॅनेज’ करणे जमल्यास दैनंदिन खर्चाची समस्या सुटते. मात्र, आपल्या खर्चावर बारीक लक्ष ठेवून अनावश्यक खर्चाला आळा घालावा. अशा कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी बजेटचे नव्याने नियोजन करावे. कोणत्याही स्थितीत कुटुंबाशी संबंधित खर्चांत कपात करू शकत नाही. मात्र, मनोरंजन व हॉटेलिंगसारख्या गोष्टींवरील खर्च कमी करू शकता. 

३) अडचणीत ‘पर्सनल लोन’ तारेल 
दैनंदिन उपजीविकेसाठी कोणत्याही स्थितीत तुमच्याकडे पैशांची उपलब्धता असावीच, मात्र ‘इमर्जन्सी फंडा’त हस्तांतरण करण्यासाठी म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक नसल्यास दैनंदिन खर्च भागविण्यासाठी ‘पर्सनल लोन’ उत्तम पर्याय आहे. थोड्या कालावधीसाठी किंवा ‘इमर्जन्सी’मध्ये ‘पर्सनल लोन’ महत्त्वाचे ठरते. हे कर्ज कोणत्याही तारणाविना मिळत असल्याने कर्ज घेण्याऱ्याचे वय, उत्पन्न, चालू कर्जे आणि ‘क्रेडिट स्कोअर’ या गोष्टी तपासल्या जातात. 

४) अडचणीच्या काळातील सच्चा मित्र : विमा 
नोकरीअभावी किंवा वेतन कपातीमुळे उत्पन्न प्रभावित झालेले असल्याने दैनंदिन वस्तूंसाठी लागणाऱ्या खर्चाव्यतिरिक्त इतर कोणताही खर्च उचलण्याची आपली क्षमता नसते. अशावेळी अचानक उद्भवणाऱ्या आणि टाळता न येणारा खर्च म्हणजे आजारपण. या खर्चापासून संरक्षण मिळविण्यासाठी स्वतःबरोबरच तुमच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांचा विमा उतरवणे महत्त्वाचे आहे. विम्यामध्ये आयुर्विमा, ‘टर्म इन्श्युरन्स’, आरोग्य विमा, गृहविमा आदी प्रकार उपलब्ध आहेत. तुमच्या गरजा जाणून योग्य विमा निवडण्यासाठी ‘सकाळ विमा’शी संपर्क साधू शकता. 

‘सकाळ मनी’ तुमच्या सोबतीला 
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सर्वांसाठीच त्रासदायक आहे. अशावेळी नवीन आणि चांगली नोकरी शोधण्यासाठी किंवा भविष्याचे नियोजन करण्यात तुम्ही मग्न असताना तुमच्या आर्थिक नियोजनाचे विश्‍वासार्ह व्यवस्थापन करण्यासाठी ‘सकाळ मनी’च्या रिलेशनशिप मॅनेजर्सना संपर्क करण्यासाठी ७३५०८ - ७३५०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मोफत ‘डिजिटल वेल्थ कॅम्प’साठी नावनोंदणी करा. अधिक माहितीसाठी ‘सकाळ मनी’च्या फेसबुकला भेट द्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: roshan thapa article on Financial