esakal | स्मार्ट खबरदारी : कोविड आणि विमा योजना
sakal

बोलून बातमी शोधा

Insurance Scheme

स्मार्ट खबरदारी : कोविड आणि विमा योजना

sakal_logo
By
रोशन थापा, बिझनेस हेड, सकाळ मनी

कोविड-१९ ची दुसरी लाट सुरु असतानाच तिसऱ्या आणि चौथ्या लाटेविषयीची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोविड-१९ चा समर्थपणे सामना करण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहाराबरोबरच योग्य विमा योजनेची सांगड घालणे देखील तितकेच आवश्यक आहे.

कोविड-१९च्या सुरवातीच्या टप्प्यात उपचारासाठी लागणारे पीपीई किट किंवा इतर ‘डिस्पोजेबल’ वस्तू, होम केअर ट्रीटमेंट आदींचा विमा योजनांमध्ये समावेश नव्हता. त्यामुळे, रुग्णांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. मात्र, विमा नियामक संस्था ‘आयआरडीए’च्या मार्गदर्शक नियमावलीनुसार जवळपास सर्वच विमा कंपन्यांनी कमी-अधिक प्रमाणात या गोष्टींचा समावेश आपल्या योजनांमध्ये केला आहे. त्यामुळे, कोविडच्या उपचारासाठी येणारा खर्च लक्षात घेता उपचारासाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा समावेश असलेली विमा पॉलिसी असणे अत्यावश्यक आहे.

कोरोना कवच, की आरोग्य विमा पॉलिसी

कोरोना कवच पॉलिसी ही केवळ कोविडच्या उपचारापुरतीच असल्याने त्याचे फायदे मर्यादित आहेत. तसेच सुरवातीच्या ‘आयआरडीए’च्या नियमावलीनुसार, १८ वर्षांखालील मुलांचा आणि ६५ वर्षांवरील व्यक्तींचा यात समावेश नसल्याने पॉलिसीच्या उपयुक्ततेला अनेक मर्यादा आहेत. अशावेळी संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देणारी नेहमीची आरोग्य विमा पॉलिसीच योग्य पर्याय आहे. यात कोविड शिवाय इतर आजार, मॅटर्निटी आणि ॲक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशन यासारखे सर्व फायदे मिळत. अशा विमा पॉलिसी केवळ ३५०० ते ४००० रुपयांपासून उपलब्ध आहेत. अर्थातच, वयानुसार आणि कुटुंबातील सदस्यसंख्येनुसार प्रीमियमच्या रकमेत बदल होतो.

प्रीमियम नव्हे, तर क्लेम महत्त्वाचा

विमा घेताना प्रीमियम रकमेचा विचार होणे स्वाभाविक असले तरी केवळ त्याआधारे विमा योजना निवडणे योग्य ठरणार नाही. विमा घेताना काही शे किंवा हजार रुपयांचा विचार करताना हॉस्पिटलचा खर्च लाखो रुपयांमध्ये असू शकतो, हे विसरता कामा नये. त्यामुळे ‘कॅशलेस’ असो किंवा ‘रिएम्बर्समेंट’ क्लेम मिळविताना तो जास्तीत जास्त प्रमाणात मिळावा यासाठी सर्वसमावेशक योजना निवडणे आवश्यक आहे. प्रसंगी थोडा प्रीमियम जास्त असला तरीसुद्धा!

‘सकाळ बिमा’ची टीम तुमच्या मदतीला!

रुग्णालयात दाखल होण्याचे (हॉस्पिटलायझेशन) प्रमाण वाढत असताना तुमच्या परिसरातील नेटवर्क हॉस्पिटल तपासणे, तुमची गरज आणि बजेट लक्षात घेऊन योग्य विमा पॉलिसी निवडण्याबरोबरच क्लेम मिळविताना कोणती कागदपत्रे सादर केली पाहिजेत, जास्तीत जास्त क्लेम मिळावा यासाठी काय केले पाहिजे, क्लेम मिळण्यामध्ये होणारा विलंब हे सर्व समजून सांगण्याबरोबरच प्रत्यक्ष क्लेम मिळविण्यात मदत करण्यासाठी ‘सकाळ बिमा’ने जाणकार आणि अभ्यासू कर्मचारी आणि विमा सल्लागारांची टीम उभी केली आहे. तुम्ही देखील ७३५०८ ७३५०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल नोंदवून योग्य विमा पॉलिसी घेण्यासाठी ‘सकाळ बिमा’च्या सल्लागारांशी संपर्क साधू शकता. (www.sakalbima.com)

(लेखक ‘सकाळ बिमा’चे प्रिन्सिपल ऑफिसर आहेत.)

loading image