GST Collection : जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन घटले; १,४३,६१२ कोटींची वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GST

GST Collection : जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन घटले; १,४३,६१२ कोटींची वसुली

GST Collection : ऑगस्ट 2022 मध्ये 1,43,612 कोटी रुपयांचे GST संकलन झाले. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 28 टक्के अधिक आहे. सलग सहाव्या महिन्यात जीएसटी संकलन 1.4 लाख कोटींहून अधिक झाले आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. जमा झालेले संकलन जुलै 2022 च्या तुलनेत कमी असून, जुलैमध्ये 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,48,995 कोटी इतके होते.

अर्थ मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक सुधारणांसह जीएसटीच्या चांगल्या कामगिरीमुळे जीएसटी महसुलात सकारात्मक वाढ झाल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट 2022 मध्ये एकत्रित GST महसूल 1,43,612 कोटी रुपये होता, ज्यामध्ये केंद्रीय GST (CGST) रुपये 24,710 कोटी, राज्य GST (SGST) रुपये 30,951 कोटी इतका आहे. एकात्मिक जीएसटीच्या रूपात 77,782 कोटी रुपयांचे संकलन झाल्याचे केंद्राने निवेदनात नमुद केले आहे. त्यापैकी 42,067 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर कर म्हणून जमा झाले आहेत. त्याचवेळी ऑगस्ट महिन्यात सेसच्या स्वरुपात 10,168 कोटी रुपये वसूल झाले आहेत.

Web Title: Rs 143612 Crores Gross Gst Revenue Collected In The Month Of August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :moneyGST