esakal | 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'या' चार गोष्टी, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम | Money
sakal

बोलून बातमी शोधा

चेकबुक

1 ऑक्टोबरपासून बदलणार 'या' चार गोष्टी, खिशावर होणार परिणाम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून बँकेशी संबंधित (banking new rules) अनेक नियम बदलणार आहेत. त्याचा सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होईल. चेक बुक, ऑटो डेबिट पेमेंट, एलपीजी सिलिंडरची किंमत आणि अनेक बँकाचे पेन्शन संबंधित नियम या गोष्टी १ ऑक्टोबरपासून बदलणार आहेत.

हेही वाचा: सर्वसामान्यांना दिलासा, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेल दर

जुने चेक बुक बंद होतील -

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBII) आणि अलाहाबाद बँकेची जुनी चेकबुक ऑक्टोबरपासून काम करणार नाहीत. या बँका इतर बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत, त्यानंतर खातेधारकांचे खाते क्रमांक, चेकबुक, आयएफएससी आणि एमआयसीआर कोड बदलण्यात आले. आतापर्यंत ग्राहक जुने चेकबुक वापरत होते, पण १ ऑक्टोबरपासून ते तसे करू शकणार नाहीत. अशा स्थितीत खातेदारांना नवीन चेकबुक काढावे लागणार आहे.

पेन्शन नियमांमध्ये बदल होईल -

डिजिटल जीवन प्रमाणपत्राशी संबंधित नियम पुढील महिन्याच्या पहिल्या दिवसापासून बदलणार आहेत. पुढील महिन्यापासून देशातील सर्व वृद्ध निवृत्तीवेतनधारक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे ते देशातील सर्व प्रमुख पोस्ट ऑफिसच्या जीवन प्रमाण केंद्रांवर डिजिटल जीवन प्रमाणपत्रे सादर करू शकतील. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये बदल -

बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे नियम बदलले आहेत. म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन लागू होईल. 1 ऑक्टोबर 2021 पासून MSC कंपन्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या 10 टक्के रक्कम म्युच्युअल फंडांच्या युनिटमध्ये गुंतवावी लागेल. तर 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने ते पगाराच्या 20 टक्के होईल.

ऑटो डेबिट पेमेंट पद्धतीत बदल -

ऑक्टोबरपासून क्रेडिट-डेबिट कार्डच्या पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून तुमच्या क्रेडिट/डेबिट कार्डवरून ऑटो पेमेंटचा नवा नियम लागू करण्यात आला आहे, ज्याअंतर्गत ग्राहकांना माहिती दिल्याशिवाय बँका तुमच्या खात्यातून पैसे कापू शकणार नाहीत. बँक यासाठी तुम्हाला आधी माहिती देईल. त्यानंतर सर्व पेमेंट तुमच्या बँकेतून कापले जाईल. बँकेने विचारल्यानंतर ग्राहकाने परवानगी दिली तरच बँकेला संबंधित ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापता येईल.

एलपीजी सिलेंडरच्या किमती -

1 ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होणार आहे. घरगुती एलपीजी आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केले जातात.

loading image
go to top