रुपयाचा तीन आठवड्यांतील नीचांक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी 22 पैशांची घसरण होऊन 71.54 या तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. 

मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी 22 पैशांची घसरण होऊन 71.54 या तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक अर्थव्यवस्थेसमोर "कोरोना' विषाणूमुळे निर्माण झालेले संकट, देशातून बाहेर सुरू असलेला परकी निधीचा ओघ आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण याचा फटका रुपयाला बसत आहे. चलन बाजारात आज सकाळपासूनच रुपयात घसरण सुरू होती. अखेर मागील सत्राच्या तुलनेत रुपया 22 पैशांची घसरण होऊन 71.54 या पातळीवर बंद झाला. ही रुपयाची मागील तीन आठवड्यांतील नीचांकी पातळी आहे. याआधी 30 जानेवारीला रुपया नीचांकी पातळीवर आला होता. 

खनिज तेलाच्या भावात घसरण कायम  
खनिज तेलाच्या भावातील घसरण मंगळवारी कायम राहिली. खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 1.89 टक्‍क्‍यांची घसरण होऊन 56.58 डॉलरवर आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rupee fell 22 paise to close at three-week low against the dollar on Tuesday