मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी उचलले ठोस पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

पालकांनो, साजरा करूया ‘एसआयपी डे’!
वार व तारीख - शनिवार,  १९ ऑक्‍टोबर २०१९
वेळ - सकाळी १० ते दुपारी २  
स्थळ - ‘सकाळ’ कार्यालय, ५९५ बुधवार पेठ, शनिवारवाड्याजवळ, पुणे 
 नावनोंदणीसाठी फक्त मिस्ड कॉल द्यावा.  त्यासाठीचा क्रमांक - ७४४७४५०१२३

आपल्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आर्थिक तरतूद करणे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी, करिअरसाठी आजकाल बरेच पैसे लागतात. यासाठी योग्य वेळी गुंतवणुकीला सुरवात करणे खूप महत्त्वाचे असते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन सजग पुणेकर पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या नावे म्युच्युअल फंडात ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) सुरू करण्याचे एक ठोस पाऊल उचलले आहे. 

निमित्त होते ‘सकाळ मनी’ने आयोजित केलेल्या ‘एसआयपी डे’चे! सामाजिक गरज लक्षात घेऊन ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात आयोजित केलेल्या या उपक्रमाला पालकवर्गाने मोठा प्रतिसाद दिला. या ठिकाणी आलेले पालक आपापल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी काहीतरी आर्थिक तरतूद करण्यास उत्सुक आणि आतूर दिसत होते. शिक्षणाचा आजचा खर्च १० किंवा २० वर्षांनंतर किती असेल, लग्नाचा आजचा खर्च आणि १०-१५ वर्षांनंतरचा खर्च, घराची आजची किंमत आणि भविष्यातील किंमत, महागाईवाढ आणि भविष्यातील किंमत, या सर्वांचा विचार या पालकांच्या मनात घोळत होता. या पार्श्‍वभूमीवर, ‘सकाळ मनी’च्या टीमने त्यांना मार्गदर्शन केले. ‘एसआयपी’द्वारे बाजारातील चढ-उतार आणि महागाईवर मात करता येऊ शकते, याविषयी त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलांच्या भविष्यासाठी पुरेशी तरतूद करण्याच्या उद्देशाने मुलांच्या नावे ‘एसआयपी’ सुरू करण्यास अनेकांनी प्राधान्य दिले. या निमित्ताने लावलेले पैशाचे झाड भविष्यात बहरल्यानंतर त्याची मधुर फळे त्यांच्यासह त्यांच्या पाल्यांनाही चाखायला मिळणार आहेत. याद्वारे आपली स्वप्नपूर्ती होणार असल्याची जाणीव उपस्थित पालकांना झाल्याचे जाणवले. 

‘एसआयपी डे’चे पुन्हा आयोजन
या उपक्रमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद लक्षात घेऊन येत्या शनिवारी (ता. १९ ऑक्‍टोबर) पालकांसाठी अशाच प्रकारचा उपक्रम पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे ‘सकाळ मनी’चे बिझनेस हेड रोशन थापा यांनी सांगितले. लहान मुला-मुलींच्या पालकांसाठी या खास ‘एसआयपी डे’चे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी पालकांना आपल्या छोट्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्याची तरतूद म्हणून ‘एसआयपी’चा श्रीगणेशा करता येईल. दरमहा अगदी किमान ५०० रुपयांपासून ‘एसआयपी’ला 

सुरवात करता येते. आघाडीच्या तब्बल ३० म्युच्युअल फंड कंपन्यांमधून चांगल्या योजना निवडता येणार आहेत. तेव्हा या सुवर्णसंधीचा पालकांनी अवश्‍य लाभ घ्यायला हवा. ‘सकाळ मनी’ची टीम ही स्वप्ने साकार करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करेल. 

तेव्हा शुभस्य शीघ्रम!
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे.

पालकांनो, साजरा करूया ‘एसआयपी डे’!
वार व तारीख - शनिवार,  १९ ऑक्‍टोबर २०१९
वेळ - सकाळी १० ते दुपारी २  
स्थळ - ‘सकाळ’ कार्यालय, ५९५ बुधवार पेठ, शनिवारवाड्याजवळ, पुणे 
 नावनोंदणीसाठी फक्त मिस्ड कॉल द्यावा.  त्यासाठीचा क्रमांक - ७४४७४५०१२३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Money Parents of children took concrete steps for the future