तुमची आर्थिक कुंडली आता सरकारच्या हाती!

साकेत गोडबोले
Monday, 27 July 2020

बदललेल्या फॉर्म ‘२६एएस’च्या ‘पार्ट-ई’मध्ये व्यवहाराचे प्रकार, तारीख, रक्कम, ‘एसटीएफ’ भरणाऱ्याची माहिती (बॅंक,स्टॉक एक्‍स्चेंज,ईपीएफओ, स्टेट रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट आदी) असतील.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) या वर्षापासून फॉर्म ‘२६एएस’मध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या बदलांनुसार, या फॉर्ममध्ये करदात्याच्या आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती असते, त्याला स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रॅन्झॅक्‍शन्स (एसटीएफ) असे म्हटले जात आहे.

या बदललेल्या फॉर्ममध्ये आता पुढील गोष्टी समाविष्ट असतील. त्यामुळे एकप्रकारे तुमची आर्थिक कुंडलीच सरकारच्या हाती असणार आहे.

  • तुमच्या उत्पन्नावरील उद्‌गम करकपात (टीडीएस)
  • फिक्‍स्ड डिपॉझिटवरील ‘टीडीएस’
  • मालमत्ता घेताना भरलेला ‘टीसीएस’
  • ॲडव्हान्स टॅक्‍स
  • रिफंड
  • तुमच्या मालमत्तेवरील आणि शेअर बाजार, म्युच्युअल फंडामधील व्यवहारांची माहिती
  • क्रेडिट कार्ड पेमेंट
  • बॅंक खात्यामधील रक्कम भरणे किंवा काढण्याची माहिती

बदललेल्या फॉर्म ‘२६एएस’च्या ‘पार्ट-ई’मध्ये व्यवहाराचे प्रकार, तारीख, रक्कम, ‘एसटीएफ’ भरणाऱ्याची माहिती (बॅंक, स्टॉक एक्‍स्चेंज, ईपीएफओ, स्टेट रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट आदी) असतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक आर्थिक व्यवहार करण्यासाठी ‘पॅन’ महत्त्वाचा असतो. अशाप्रकारे प्रत्येक आर्थिक व्यवहाराची माहिती ही टॅक्‍स ॲथॉरिटीकडे रेकॉर्ड होते. याचा उपयोग करून ‘टीडीएस’बरोबर मालमत्ता घेणे-विकणे, शेअर किंवा म्युच्युअल फंड घेणे-विकणे, शेअर किंवा म्युच्युअल फंडावरील लाभांश याची माहिती नव्या फॉर्मवर आपोआप येईल.
यामुळे कर भरणाऱ्याचे टॅक्‍स रिटर्न फाईल करायचे ओझे कमी होईल आणि फाईल करताना होणाऱ्या चुका पण निघून जातील, हे यामागचे उद्दिष्ट आहे.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saket godbole writes article about Financial Transactions