2022 मध्ये सरासरी पगारात 8 ते 12 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salary

2022 मध्ये सरासरी पगारात 8 ते 12 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

मुंबई : भारतीय कंपन्यांकडून साकारात्मक दृष्टीकोन बघता यावर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात ९ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. माइकल पेज वेतनच्या रिपोर्टनुसार २०२२ या वर्षात सामान्य वेतनवाढ ही ९ टक्के राहील अशी शक्यता असून मागच्या वर्षी ही वेतनवाढ ७ टक्के इतकी होती. तसंच रिपोर्टनुसार युनिकॉर्नसह स्टार्टअप आणि नव्या काळातील संघटना वेतनवृद्धीचे नेतृत्व करतील आणि त्यांच्या द्वारे तब्बल १२ टक्के वेतनवाढ होण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार ही वेतनवाढ बॅंकिंग, वित्तीय सेवा, संपत्ती आणि उत्पादन उद्योग या क्षेत्रात असेल. त्याव्यतिरिक्त डेटा संशोधक (मशीन लर्निंगशी परिचित), वेब डेव्हलपर्स आणि क्लाउड आर्किटेक्टची सुद्धा वेतनवाढीसाठी मागणी असल्याचं बोललं जातंय. तसंच तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे समान शैक्षणिक पात्रता आणि वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अधिक असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मशिद भोंगे प्रकरण : मनसेला आता वसंत ना'पसंत'; शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी

माइकल पेज वेतन रिपोर्ट २०२२ हा डेटा आणि नेटवर्कच्या आधारे प्राप्त माहितीवरुन बनवला गेला आहे. ज्यामध्ये 2021 मध्ये केलेल्या नोकऱ्यांची जाहीरात, नोकऱ्या आणि २०२२ साठी वेतनाचा अंदाजसुद्धा सामील आहे. या रिपोर्टमध्ये पुढं म्हटलंय की, कंपन्या आता छोट्या तिमाही किंवा अर्ध-वार्षिक-मूल्यांकन चक्र, पदोन्नती, परिवर्तनीय वेतन, स्टॉक इन्सेन्टिव्ह, रिटेन्शन बोनस आणि मध्यावधी वाढीसह विविध ऑफर्ससह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना कायम ठेवण्याचा विचार करत आहेत.

तसेच उच्च आणि विशेष प्रदर्शन करणारे कर्मचारी आपल्या पगारवाढीसाठी अपेक्षा करु शकतात. तसेच भारताचे प्रबंध निर्देशक अंकित अग्रवाल यांनी या रिपोर्टवर म्हटलंय की, नोकऱ्या सोडणे, प्रतिभेची तीव्र कमतरता आणि मागणीनुसार कौशल्याचा अभाव हा मेगा बूस्टचा परिणाम आहे जो मुख्यत्वे करुन पगारवाढीसाठी कारणीभूत ठरतो.

Web Title: Salary Increment Till 8 To 12 Percent Indian Employee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top