नोव्हेंबरमध्ये आणखी एका दिग्गज कंपनीचा IPO, कमाईची संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 IPO

नोव्हेंबरमध्ये आणखी एका दिग्गज कंपनीचा IPO, कमाईची संधी!

IPO गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे. दिवाळीनंतर आणखी एक IPO बाजारात दाखल होत आहे. यामुळे तुम्हाला गुंतवणुकीची संधी वाढणार आहे. KFC आणि पिझ्झा हट आउटलेट्स चालवणाऱ्या Sapphire Foods India चा हा IPO असणार आहे. 9 नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी हे उघडेल आणि 11 नोव्हेंबरला बंद होईल. फर्म 22 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजेसवर लिस्टिंग करण्याची योजना आखत आहे. याच दिवशी पेटीएमचा आयपीओही येणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असू शकतो.

50 लाख शेअर्सची विक्री

IPO मध्ये आत्ताचे भागधारक आणि प्रवर्तकांकडून 17.57 दशलक्ष शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर असणार आहे. OFS मध्ये, QSR मॅनेजमेंट ट्रस्टद्वारे 8.50 लाख शेअर्स विकले जातील. 5.57 दशलक्ष शेअर्स सॅफायर फूड्स मॉरिशस लिमिटेडद्वारे विकले जातील. WWD रुबी लिमिटेडद्वारे 4.85 दशलक्ष शेअर्स विकण्यात येणार आहे.

Sapphire Foods India ची IPO द्वारे 1500-2000 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. कंपनीने सेबीकडे दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार IPO अंतर्गत कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPO
loading image
go to top