'रिलायन्स इंडस्ट्रीज कर्जमुक्तीकडे; 'जिओ' प्लॅटफार्ममधील एक टक्का सौदीची कंपनी घेणार!

टीम ई-सकाळ
Sunday, 14 June 2020

साधारणपणे एवढ्याच रकमेचा निधी उभारण्याचा प्रयत्न याच वर्षी केला जाऊ शकतो. तसे झाल्यास कंपनी नियोजित उद्दिष्टापूर्वीच कर्जमुक्त होऊ शकते.

मुंबई : कोविड-19 च्या संकटामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या काळात एकीकडे अर्थ-उद्योग क्षेत्रातील व्यवहार ठप्प झालेले असताना, दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 'जिओ' प्लॅटफार्मवर मात्र गुंतवणुकीचा धनवर्षाव सुरू आहे. कंपनीने आतापर्यंत १.२४ लाख कोटी रुपये उभे केले असून, आणखी ५ ते १० हजार कोटी रुपये उभे करण्याची शक्यता आहे. हे सर्व पाहता कंपनी कर्जमुक्तीच्या दिशेने जोरदार वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.

अर्थविषयक घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रिलायन्स इंडस्ट्रीज आता सौदी अरेबियातील पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडाबरोबर (पीआयएफ) चर्चा करीत असून, त्यांच्याकडून प्रारंभी सुमारे ५ हजार कोटी रूपयांच्या निधीबाबत निर्णय होऊ शकतो. हा साधारणपणे १ टक्के हिश्श्यासाठीचा निधी असू शकतो, असे समजते. साधारणपणे एवढ्याच रकमेचा निधी उभारण्याचा प्रयत्न याच वर्षी केला जाऊ शकतो. तसे झाल्यास कंपनी नियोजित उद्दिष्टापूर्वीच कर्जमुक्त होऊ शकते. "रिलायन्स जिओ'वर रोजच धन वर्षाव सुरू आहे. आता लवकरच रिलायन्स रिटेलच्या ऑनलाईन ऑर्डरिंग प्लॅटफर्म जिओ मार्टचे कामकाज सुरू होत आहे.

किती जमवला पैसा?

  • व्यवहारांमधून उभा राहिलेला पैसा : रु. 1.04 लाख कोटी
  • ताज्या राईट्‌स इश्‍यूच्या माध्यमातून जमणारा पैसा : रु. 13,000 कोटी
  • गेल्या आर्थिक वर्षात 'ब्रिटीश पेट्रोलियम'ची गुंतवणूक : रु. 7,000 कोटी

अर्थविषयक घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परिणाम काय होणार?

  • जिओ इन्फोकॉम : देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी
  • 2016 च्या अखेरीस सुरू झालेल्या प्रवासापासून आतापर्यंतची ग्राहकसंख्या : 38 कोटी 80 लाख
  • ब्रॉडबॅंड कनेक्‍टिव्हिटी, स्मार्ट डिव्हायसेस, क्‍लाउड आणि एज कॉम्प्युटिंग, बिग डेटा अॅनालिटिक्‍स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आदी अद्ययावत डिजिटल इकोसिस्टीममध्ये मोठी गुंतवणूक
  • भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत 'जिओ'चा दबदबा वाढणार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saudi public investment fund investments jio platform