SBI ने FDवरील व्याजदर वाढवून ग्राहकांना दिलं गिफ्ट

गुंतवणुकीचे हे एक चांगले माध्यम आहे.
SBI
SBIesakal
Summary

गुंतवणुकीचे हे एक चांगले माध्यम आहे.

टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉजिट (Tax Saving Fixed Deposits) हे गुंतवणुकीचे सर्वात आकर्षक साधन आहे. ज्या गुंतवणूकदारांना आपल्या कमाईवर जोखीम घ्यायची नाही, त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे हे एक चांगले माध्यम आहे. इतर बँकांप्रमाणे एसबीआयही (SBI) आपल्या ग्राहकांना टॅक्स सेव्हिंग एफडी देत आहे.

SBI
SBI अन् PNB मध्ये बँक खातं आहे, मिस्ड कॉल द्या जाणून घ्या बॅलन्स

देशातील सर्वात मोठी बँक देत असलेल्या टॅक्स सेव्हिंग करणाऱ्या एफडीचा लॉक इनचा कालावधी पाच वर्षांचा आहे. बँकेच्या ग्राहकांना करबचत करणारी एफडी उघडायची असेल तर SBIच्या नेट बँकिंग सुविधेच्या माध्यमातून ते उघडू शकतात. विशेष म्हणजे यातील गुंतवणुकीवर तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत करसवलतही घेऊ शकता.

जाणून घ्या एफडीवर किती व्याज दर

SBI एक वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर 5.10 टक्क्यांपासून 5.40 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. अलिकडेच बँकेने दीर्घकालीन एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. याअंतर्गत दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 5.10 टक्क्यांवरून 5.20 टक्के करण्यात आला आहे. तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी हा दर 5.30 टक्क्यांवरून 5.45 टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे SBIने टॅक्स सेव्हिंग एफडीवरील व्याजदरही 5.40 टक्क्यांवरून 5.50 टक्के केला आहे.

SBI
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचे; ATMमधून पैसे काढण्यासाठी 'हा' नंबर महत्त्वाचा

ऑनलाइन असे उघडू शकता टॅक्स सेव्हिंग एफडी

- SBI च्या वेबसाइटवर जाऊन नेट बँकिंग ओपन करा.

- एफडी टॅबअंतर्गत ई-टीडीआर/ईएसटीडीआरवर क्लिक करा.

- आयकर बचत योजनेत जाऊन ई-टीडीआर/ईएसटीडीआरवर क्लिक करा.

- त्यानंतर प्रोसीड बटणावर क्लिक करा.

- खाते आणि रक्कम सिलेक्ट करा आणि टर्म अँड कंडिशन ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

- त्यानंतर कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करा.

- यानंतर जे पेज ओपन होईल, त्याला तुमच्या टॅक्स सेव्हिंग एफडीची संपूर्ण माहिती मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com