esakal | SBI च्या ऑनलाईन सेवा ठप्प; ATM राहणार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

SBI

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑनलाईन बँकिंग सेवा (Online Banking Services) ठप्प झाली आहे.

SBI च्या ऑनलाईन सेवा ठप्प; ATM राहणार सुरु

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑनलाईन बँकिंग सेवा (Online Banking Services) ठप्प झाली आहे. एसबीआयने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. असे असले तरी एटीएम सुविधा (ATM) आणि पीओएस मशीन सुरु राहणार आहेत.  

बँकेने ट्विटमध्ये म्हटलंय की, आमच्यासोबत जोडले रहा, अशी आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करतो. लवकरच सेवा सामान्य होऊन पुन्हा सुरु होईल. कनेक्टिवीटी कारणांमुळे ग्राहकांना आज ऑनलाईल बँकिस सेवेचा वापर करण्यात अडचणी येणार आहेत.