'एसबीआय'च्या नफ्यात घसरण 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) निव्वळ नफ्यात दुसऱ्या तिमाहीत 69 टक्के घसरण होऊन तो 576 कोटी रुपयांवर आला आहे. 

बॅंकेला मागील आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 1 हजार 840 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत बॅंकेला 4 हजार 875 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बॅंकेने बुडीत कर्जांसाठी केलेल्या जादा तरतुदीमुळे हा तोटा झाला होता.

दुसऱ्या तिमाहीत बॅंकेचे एकूण उत्पन्न 79 हजार 302 कोटी रुपयांवर पोचले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत 74 हजार 948 कोटी रुपये होते. बॅंकेचे एकूण थकीत कर्जांचे प्रमाण वाढून 9.95 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. गेल्या वर्षी ते 9.83 टक्के होते. बॅंकेचे निव्वळ थकीत कर्जांचे प्रमाण 4.53 टक्के आहे. याचबरोबर थकीत कर्जांसाठीची तरतूद 10 हजार 381 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात ती 16 हजार 842 कोटी रुपये होती. 

बॅंकेचा समभाग वधारला 
मुंबई शेअर बाजारात स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या समभागात आज 3.45 टक्के वाढ झाली. बॅंकेचा समभाग वधारून 295 अंशांवर बंद झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI profit margin declines

टॅग्स