खूशखबर! आता तुमचा हफ्ता होणार कमी! एसबीआयची ग्राहकांना भेट

SBI reduces their MCLR rate by zero point 10 percent
SBI reduces their MCLR rate by zero point 10 percent

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. बँकेनं एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. ही कपात 0.10 टक्के इतकी आहे. आता 1 वर्षाच्या एमसीएलआरचे व्याज दर 8.25 टक्क्यांपेक्षा कमी करून ते 8.15 टक्के केले आहे. नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होतील.

यामुळे आता ग्राहकांसाठी खूशखबर आहे. आता गृहकर्ज, ऑटो आणि पर्सनल लोन स्वस्त होणार. तुमचं कर्ज सुरू असले तरीही तुम्हाला याचा फायदा मिळेल.

बँकेनं एमसीएलआर वाढवला किंवा कमी केला, तर त्याचा परिणाम कर्ज घेणाऱ्या नव्या ग्राहकांवर तर पडतोच. पण ज्यांनी एप्रिल 2016नंतर कर्ज घेतलंय त्यांच्यावरही परिणाम होतो. एप्रिल 2016च्या आधी रिझर्व्ह बँकेद्वारे कर्ज देण्यासाठी ठरलेला कमीत कमी रेट बेस रेट म्हणला जायचा. म्हणजे बँक याहून कमी दरानं ग्राहकांना कर्ज देऊ शकत नव्हती. 1 एप्रिल 2016 पासून बँकिंग सिस्टिममध्ये एमसीएलआर लागू झाला आणि हा कर्जाचा कमीत कमी दर झाला. त्यानंतर एमसीएलआरच्या आधारावर कर्ज दिले जायला लागले.

तसेच तुम्हाला गृहकर्ज किंवा पर्सनल कर्ज घेताना लागणारा वेळ नको वाटतो. म्हणूनच आता नवी सिस्टिम येतेय. त्यामुळे तुम्हाला 1 तासात कर्ज मिळू शकतं. तुम्ही 'पीएसबी लोन इन 59 मिनिट' द्वारे कुठल्याही ताणाशिवाय कर्ज घेऊ शकता. या प्रोजेक्टला तत्वत: मंजुरी मिळालीय. एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा यांच्यासहित 10 सरकारी बँका 'पीएसबी लोन इन 59 मिनिट' द्वारे कर्ज देऊ शकतात. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ही सुविधा सुरू केली होती. त्यात 59 मिनिटांमध्ये कर्ज मिळू शकतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com