SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट, ATM वापरताना या 9 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं

सकाळ ऑनलाइन टीम
Monday, 11 January 2021

एटीएमचा वापर करताना या टिप्स लक्षात ठेवल्याच पाहिजेत. 

नवी दिल्ली- डिजिटल बँकिंग आणि एटीएमवर वाढत्या अवलंबित्वामुळे घोटाळ्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. सर्व बँका ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पाऊल उचलत असतात. तरीही एटीएमचा वापर करताना मोठ्यासंख्येने ग्राहकांची फसवणूक होतेच. अशात देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी 9 आवश्यक टिप्स शेअर केल्या आहेत. एटीएमचा वापर करताना या टिप्स लक्षात ठेवल्याच पाहिजेत. 

1. ATM किंवा POS मशीनवर एटीएम कार्डचा वापर करताना कीपॅड हाताने लपवा. त्यामुळे इतर कोणालाही आपला पिन कोड सहजपणे दिसणार नाही. 

2. कधीही आपला पिन किंवा कार्ड डिटेल्स कोणाबरोबरही शेअर करु नका. ही माहिती कायम स्वतः पुरती मर्यादित ठेवा.

3. आपल्या कार्डवर कधीही PIN लिहू नका. जर चुकीने तुमचे कार्ड हरवले तर कोणीही त्याचा वापर करुन पैसे काढू शकतो. 

हेही वाचा- Gold rate today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त

4. कोणत्याही ई-मेल, मेसेज किंवा कॉलवर जर कार्ड डिटेल्स अथवा पिन मागितले तर चुकूनही ही माहिती देऊ नये. आजकाल फसवणुकीचे नवनवे प्रकार वापरुन तुमच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. लक्षात ठेवा बँक कधीही हे आपली माहिती मागत नसते. 

5. तुमच्या वाढदिवसाची तारीख, फोन किंवा अकाऊंट नंबरचा कधीही PIN साठी वापर करु नका. यामुळे तुमच्या पिनचा अंदाज घेणे सोपे जाईल. पासवर्ड असा असायला हवा की, त्याची माहिती तुमच्या निकटवर्तीयालाही समजू नये.

6. ट्रांजेक्शनची पावती एकतर तुमच्याकडे ठेवा अथवा फाडून कचरापेटीत फेकून द्या. या पावतीमध्ये तुमच्या अकाऊंटसंबंधी माहिती असते. 

7. एटीएममध्ये ट्रांजेक्शन सुरु करण्यापूर्वी तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही याची खात्री करुन घ्या. 

हेही वाचा- म्युच्युअल फंड : बिझनेस सायकल फंड : काळाच्या कसोटीवर खरे ठरेल

8. एटीएमचा वापर करण्यापूर्वी त्याचा कीपॅड आणि कार्ड स्लॉट तपासून पाहा. अनेकवेळा यावर एक डिव्हाईस चिटकवलेले असू शकते. यामध्ये तुमची सर्व माहिती स्टोअर केली जाते.

9. तुमच्या ट्रांजेक्शनचे मोबाइल अलर्ट सुरु असल्याची खात्री करा. जर तुमच्या खात्यातून माहिती न देता काढले गेले तर तुम्हाला याची माहिती त्वरीत मिळेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI shared 9 tips for customers on using ATM cards To avoid deception