esakal | अर्थबोध - ‘सिक्रेट्स ऑफ द मिल्यनेअर माईन्ड’

बोलून बातमी शोधा

money
अर्थबोध - ‘सिक्रेट्स ऑफ द मिल्यनेअर माईन्ड’
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अतुल सुळे

कोणतीही गोष्ट फलद्रूप होण्याची किंवा प्रत्यक्षात येण्याची प्रक्रिया कशी असते? प्रथम आपल्या मनात विचार निर्माण होतो, मग भावना, नंतर कृती आणि शेवटी परिणाम म्हणजे ‘रिझल्ट’ दिसतो. परंतु, मुळात आपल्या मनात विचार कोठून येतात? या प्रश्नाचे उत्तर आहे आपले भूतकाळात जसे ‘कंडिशनिंग’ झालेले असेल, त्याचप्रमाणे आपल्या मनात विचार येत असतात. सध्या जर तुम्ही श्रीमंत नसाल, तर सर्वप्रथम तुम्हाला आपले भूतकाळातील पैशासंबंधीचे झालेले ‘कंडिशनिंग’ बदलावे लागेल, असा संदेश लेखक आणि व्यावसायिक टी. हार्व एकर यांनी आपल्या न्यूयॉर्क टाइम्स, वॉल स्ट्रीट जर्नल आणि युएसए टुडे च्या बेस्टसेलर ‘सिक्रेट्स ऑफ द मिल्यनेअर माईन्ड’ या पुस्तकाद्वारे वाचकांना दिला आहे. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर तुमच्या मनाच्या ‘फायलिंग कॅबिनेट’मधील अथवा ‘हार्ड डिस्क’वरील १७ फाईल तपासून बघून त्यातील काही फाईल बदलाव्या लागतील. श्रीमंत असलेल्या आणि श्रीमंत नसलेल्या व्यक्तींच्या विचार करण्याच्या पद्धतीतील काही फरक पुढीलप्रमाणे-

श्रीमंत लोकांना खात्री असते, की मी माझे आयुष्य स्वतः निर्माण करतो, तर इतर लोक आयुष्य जसे आहे तसे मान्य करतात.

श्रीमंत लोक पैशाचा खेळ जिंकण्यासाठी खेळतात, तर इतर लोक न हारण्यासाठी खेळतात.

श्रीमंत लोकांना श्रीमंत व्हायचेच असते, तर इतर लोकांची श्रीमंत होण्याची फक्त इच्छा असते.

श्रीमंत लोक संधीवर लक्ष केंद्रित करतात, तर इतर लोक अडथळ्यांवर!

श्रीमंत लोक भीतीवर मात करून कृती करतात, तर इतर लोक भीती, संकट आणि अडथळ्यांना घाबरून कृती करीत नाहीत.

संपादन- स्वाती वेमूल