निर्देशांकांची उच्चांकी वाटचाल सुरूच

पीटीआय
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई - शेअर बाजारातील तेजीची लाट गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ५१ अंशांची वाढ होऊन ३८ हजार ३३६ अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये आज ११ अंशांची वाढ होऊन तो ११ हजार ५८२ अंशांवर बंद झाला. 

मंगळवारी परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २५४ कोटी तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १९७ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. एल अँड टी कंपनीच्या समभागात आज सर्वाधिक २.३० टक्के वाढ झाली. कंपनीच्या संचालक मंडळाने नऊ हजार कोटी रुपयांचे सहा कोटी समभाग पुनर्खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने समभागात वाढ झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex