सेन्सेक्‍स ३७७ अंशांनी कोसळला 

पीटीआय
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

मुंबई - जागतिक पातळीवरील निराशाजनक वातावरण व सार्वत्रिक निवडणुकीआधी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रस्तावित पॅकेजचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याच्या  शक्येमुळे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३७७ अंशांनी कोसळून ३५ हजार ५१३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२० अंशांनी गडगडून १० हजार ६७२ अंशांवर बंद झाला. 

सेन्सेक्‍समध्ये वेदांता, एम अँड एम, ओएनजीसी, टाटा स्टील, एस अँड टी, एचडीएफसी, आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या समभागात ३.०४ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. याचवेळी एचसीएल टेक, बजाज ऑटो, एचयूएल आणि एशियन पेंट्‌स यांच्या समभागात ०.५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. दरम्यान, ॲपल कंपनीने महसुली उत्पन्नाचा अंदाज १२ वर्षांत प्रथमच घटविला आहे. याचा फटका बसून ‘वॉल स्ट्रीट’ कोसळला. यामुळे आशियाई आणि युरोपीय शेअर बाजारांत घसरण झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex 377 Point Colapse