esakal | सेन्सेक्‍समध्ये ३९४ अंशांची घसरण 
sakal

बोलून बातमी शोधा

sensex

वाहन उद्योग, बॅंका, टेलिकॉम आदींच्या समभागांमध्ये नफावसुली झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३९४अंशांनी घसरून ३८,२२०अंशांवर; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी९६अंशांनी घसरून११,३१२अंशांवर बंद झाला.

सेन्सेक्‍समध्ये ३९४ अंशांची घसरण 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अहवालामुळे आज जागतिक शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावरही झाला. सेन्सेक्‍समध्ये ३९४ अंशांनी घसरण झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचा अमेरिकी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून बेरोजगारीही वाढणार आहे, असा फेडचा जुलै महिन्यातील बैठकीचा अहवाल बुधवारी (ता. १९) जाहीर झाला. त्यामुळे आज गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारांमध्येही जोरदार विक्री केली. वाहन उद्योग, बॅंका, टेलिकॉम आदींच्या समभागांमध्ये नफावसुली झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३९४ अंशांनी घसरून ३८,२२० अंशांवर; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९६ अंशांनी घसरून ११,३१२ अंशांवर बंद झाला. आज मुंबई शेअर बाजाराच्या ३० प्रमुख समभागांपैकी फक्त एनटीपीसी, ओएनजीसी, पॉवरग्रीड, टाटा स्टील व एचसीएल टेक या पाच समभागांच्या दरांमध्ये किरकोळ वाढ झाली. त्याउलट एचडीएफसीचे शेअर ४३ रुपयांनी (बंद भाव १,७८५ रु.) व भारती एअरटेल १० रुपयांनी घसरले. रिलायन्सदेखील २,०९६ रुपयांवर बंद झाला. 

loading image