सेन्सेक्‍स ११४५ अंशांनी घसरला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

वरच्या स्तरावरील नफावसुलीमुळे आज निर्देशांक सलग पाचव्या दिवशीही घसरला; मात्र आजची घसरण मोठी म्हणजे दोन टक्‍क्‍यांहूनही जास्त होती. सेन्सेक्‍स आज ११४५ अंशांनी, तर निफ्टी ३०६ अंशांनी घसरला.

मुंबई - वरच्या स्तरावरील नफावसुलीमुळे आज निर्देशांक सलग पाचव्या दिवशीही घसरला; मात्र आजची घसरण मोठी म्हणजे दोन टक्‍क्‍यांहूनही जास्त होती. सेन्सेक्‍स आज ११४५ अंशांनी, तर निफ्टी ३०६ अंशांनी घसरला.

आजच्या घसरणीमुळे सेन्सेक्‍स ५० हजारांच्या खाली आला. आज दिवसअखेर सेन्सेक्‍स ४९,७४४ अंशांवर, तर निफ्टी १४,६७५ अंशांवर स्थिरावला. आज सकाळी बाजाराचे व्यवहार सुरू झाल्यापासून दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण झाली. बॅंका, वाहन उद्योग, आयटी आदी सर्व क्षेत्रांच्या समभागांचे दर कमी झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजची घसरण एवढी सर्वदूर होती की, सेन्सेक्‍समधील प्रमुख ३० समभागांपैकी फक्त ओएनजीसी, एचडीएफसी बॅंक व कोटक बॅंक हे तीनच समभाग जेमतेम एक टक्‍क्‍यापर्यंत वाढले. त्या उलट डॉ. रेड्डी, टेक महिंद्र, महिंद्रा आणि महिंद्रा व इंडस्‌इंड बॅंक हे समभाग चार टक्के पडले. ऍक्‍सिस बॅंक, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स, मारुती, एचसीएल टेक, पॉवर ग्रीड, एचडीएफसी हे समभाग तीन टक्के पडले. आयसीआयसीआय बॅंक, इन्फोसीस, सनफार्मा, आयटीसी, स्टेट बॅंक या समभागांचे दरही पावणेदोन ते अडीच टक्के पडले. रिलायन्सचा दर आज पुन्हा घसरून दोन हजारांच्या महत्त्वाच्या पातळीजवळ (२००७ रु.) आला. टीसीएसही तीन हजारांच्या खाली (२९५८ रु) तर लार्सन टुब्रो १५०० च्या खाली (१४५२ रु.) आला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex fell by 1145 points