सेन्सेक्‍स उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई - मॉन्सूनची आगेकूच आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने शेअर बाजारात सोमवारी तेजी निर्माण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २७७ अंशांची झेप घेऊन ३५ हजार ९३४ अंशांवर बंद झाला. गेल्या पाच महिन्यांतील निर्देशांकाची ही उच्चांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ८० अंशांची वाढ होऊन १० हजार ८५२ अंशावर बंद झाला.  

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल लवकरच कंपन्यांकडून जाहीर होणार आहेत. त्यापूर्वीच गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य देत पोर्टफोलिओ संतुलित केला. ऊर्जा, कॅपिटल गुड्‌स, बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना आज मागणी दिसून आली. स्मॉल कॅप आणि मिडकॅपला आज चांगली मागणी होती. एचडीएफसी, भारती एअरटेल, इंड्‌सइंड बॅंक, कोल इंडिया आणि बजाज ऑटो आदी कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex at a high level