निर्देशांकांची उच्चांकी घोडदौड सुरूच

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सेन्सेक्‍सची त्रिशतकी झेप; निफ्टी ११,५०० अंशांवर
मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत; तसेच डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३३० अंशांनी वधारून ३८,२७८ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने आज ११,५०० अंशांचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर तो ८१ अंशांच्या वाढीसह ११,५५१ अंशांच्या ऐतिहासिक स्तरावर बंद झाला. 

अमेरिका-चीनने व्यापार युद्धावर चर्चेतून तोडगा काढण्याविषयी दर्शविलेली तयारी, जागतिक बाजारात खनिज तेलाच्या भावातील घसरण व रुपयाला मिळालेली बळकटी पाहता आज गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिले. कॅपिटल गूड, पोलाद तसेच ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. सेन्सेक्‍सने आज ३८,३४० अंशांपर्यंत मजल मारत आपला ९ ऑगस्ट रोजीचा ३८,०७६ अंशांचा विक्रम मोडला. निफ्टीने आज ११,५६५ अंशांपर्यंत झेप घेत नवा उच्चांक प्रस्थापित केला. दिवसअखेर तो ११,५५१ अंशांच्या ऐतिहासिक पातळीवर बंद झाला. 

सेन्सेक्‍स मंचावरील एल अँड टीच्या शेअरला सर्वाधिक मागणी होती. टाटा मोटर्स, ओएनजीसी, टाटा स्टील, वेदांता, बजाज ऑटो, रिलायन्स, एचडीएफसी बॅंक, एसबीआय, येस बॅंक, हिरो मोटोकॉर्प, विप्रो, कोल इंडिया, अदाणी पोर्ट, सन फार्मा, भारती एअरटेल, एशियन पेंट आदी कंपन्यांचे शेअर वधारले, तर इन्फोसिस, मारुती सुझकी, आयसीआयसीआय बॅंक, ॲक्‍सिस बॅंक, टीसीएससह आदी शेअर घसरणीसह बंद झाले.   

दरम्यान, आशिया, युरोपमधील प्रमुख बाजारांमध्येही आज तेजीचे वातावरण होते.

रुपयाला बळकटी 
अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा तणाव निवळत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत ३३ पैशांनी वधारून ६९.८२ च्या स्तरावर बंद झाला. गेल्या आठवड्यात रुपयाने आतापर्यंतचा सर्वांत नीचांकी स्तर गाठला होता. २७ पैशांच्या अवमूल्यनासह तो ७०.१६ च्या स्तरावर आला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Increase