महत्त्वाची बातमी: शेअर बाजारात 'दिवाळी'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग क्षेत्राला दिलेल्या मोठ्या दिल्यासामुळे शेअर बाजारात आज दिवाळी आधीच दिवाळीचे वातावरण असल्याचे चित्र आहे.  कॉर्पोरेट सेक्टरसंबंधित केलेल्या मोठ्या घोषणेमुळे शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टी वधारले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 1,732.66 अंशांनी वधारून 37 हजार 826.13 अंशांवर पोचला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 506 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी सध्या 11 हजार 211 अंशांवर व्यवहार करतो आहे.

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग क्षेत्राला दिलेल्या मोठ्या दिल्यासामुळे शेअर बाजारात आज दिवाळी आधीच दिवाळीचे वातावरण असल्याचे चित्र आहे.  कॉर्पोरेट सेक्टरसंबंधित केलेल्या मोठ्या घोषणेमुळे शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टी वधारले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 1,732.66 अंशांनी वधारून 37 हजार 826.13 अंशांवर पोचला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 506 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी सध्या 11 हजार 211 अंशांवर व्यवहार करतो आहे. आज सेन्सेक्सने इंट्राडे व्यवहारात 38 हजार 048.93 अंशांची तर निफ्टीने 11 हजार 272.80 अंशांची उच्चांकी पातळी गाठली आहे. 

सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर कमी करण्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत उत्पादन करणार्‍या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर कमी केला जाणार आहे.  उत्पादन आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात केलेल्या बदलांची अंमलबजावणी या आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असून, कोणतीही सवलत न घेणाऱ्या भारतीय कंपन्यांना २२ टक्के कर द्यावा लागेल आणि अधिभार आणि सेस मिळून एकूण २५.१७ टक्के कर द्यावा लागेल.

इक्विटी कॅपिटल गेनवरील सरचार्ज देखील रद्द करण्यात आला आहे आणि शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांपैकी ज्या कंपन्यांनी जुलै 2019 पूर्वी बॅकबॅकची घोषणा केली आहे त्यांच्या शेअर बायबॅकवर आता कर आकारला जाणार नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex increased by 1700 points