esakal | Share Market: चार दिवसांच्या घसरणीनंतर 553 अंशांनी वधारला सेन्सेक्स
sakal

बोलून बातमी शोधा

sensex

चार दिवसांच्या घसरणीनंतर 553 अंशांनी वधारला सेन्सेक्स

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: आज आठवड्याच्या पहिल्याद दिवशी म्हणजे सोमवारी शेअर मार्केट हिरव्या निशाण्यावर बंद झाले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 533.74 अंशांनी म्हणजेच 0.91 टक्क्यांच्या तेजीसह 59,299.32 च्या स्तरावर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स निफ्टी 159.20 अंशांनी म्हणजेच 0.91 टक्क्यांच्या वाढीसह 17,691.25 च्या स्तरावर बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 1,282.89 च्या अंशांनी म्हणजेच 2.13 टक्क्यांनी घसरला होता. शुक्रवारी मार्केटमध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण झाली होती. आज मार्केटची सुरुवातच हिरव्या निशाण्यावर झाली. सेन्सेक्स 294.90 अंशांच्या म्हणजेच 0.50 टक्क्यांच्या तेजीसह 59060.48 च्या स्तरावर उघडला तर निफ्टी 83.80 अंशांनी म्हणजेच 0.48 टक्क्यांच्या तेजीसह 17615.80 च्या स्तरावर उघडला.

हेही वाचा: RSSची तुलना तालिबानशी; जावेद अख्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मोठ्या शेअर्सची अशी होती कामगिरी

आज दिवसभरातील व्यापारामध्ये डिविस लॅब, हिंडाल्को, एनटीपीसी, बजाज फिनसर्व आणि टाटा मोटर्सचे शेअर्स हिरव्या निशाण्यावर बंद झाले. तर सिप्ला, ग्रासिम, यूपीएल, आईओसी आणि बजाज ऑटोचे शेअर लाल निशाण्यावर बंद झाले.

सेक्टोरियल इंडेक्सची कामगिरी

सेक्टोरियल इंडेक्समधील सगळेच सेक्टर्स आज निशाण्यावर बंद झाले. यामध्ये मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, रियाल्टी, आयटी, एफएमसीजी, फायनान्स सर्व्हीस, बँक, प्रायव्हेट बँक आणि ऑटो या सेक्टर्सचा समावेश आहे.

loading image
go to top