काँग्रेसच्या लाटेने शेअर बाजारात सुनामी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई: पाच राज्यांमध्ये येऊ घातलेले काँग्रेसचे सरकार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि त्यापाठोपाठ पंतप्रधानांच्या पाच सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. सुरजीत भल्ला (अस्थायी सदस्य) यांनी राजीनामा दिल्याचा शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सकाळच्या सत्रात 650 अंशांची घसरण झाली होती. सध्या सेन्सेक्स किंचित सावरला असून सध्या 341.62 अंशाच्या घसरणीसह 34 हजार 618.10 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निदेशांक निफ्टीमध्ये 100 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी 10 हजार 389.40 पातळीवर आहे. 

आज मुंबई शेअर बाजारात येस बँक, टेक महिंद्रा, एशियन पेंट आणि एचसीएल टेक यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत तर आयओसी, हिंदपेट्रो, 
भारती एअरटेल, टाटा स्टील आणि बीपीसीएलच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. 
 
Web Title: Sensex, Nifty trim losses