esakal | शेअर बाजार अखेर सावरला 
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजार अखेर सावरला 

शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी संपुष्टात आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 161 अंशांची वाढ होऊन 36 हजार 724 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी वधारून 10 हजार 844 अंशांवर बंद झाला.

शेअर बाजार अखेर सावरला 

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई : शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी संपुष्टात आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 161 अंशांची वाढ होऊन 36 हजार 724 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी वधारून 10 हजार 844 अंशांवर बंद झाला. धातू आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज खरेदीचा जोर होता. 

शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात अस्थिरतेचे वारे दिसून आले. सेन्सेक्‍स आज दिवसभरात 37 हजार 776 अंश या उच्चांकी आणि 36 हजार 409 या नीचांकी पातळीवर गेला होता. अखेर मागील सत्राच्या तुलनेत तो 161 अंशांनी वधारून 36 हजार 724 अंशांवर बंद झाला.

भारती एअरटेल, एसबीआय, टाटा स्टील, वेदांता, एनटीपीसी, एचडीएफसी बॅंक, एचसीएल टेक, ओएनजीसी, आयसीआयसीआय बॅंक आणि एल अँड टी यांच्या समभागात 2.97 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. याचवेळी सन फार्मा, टाटा मोटर्स, एशियन पेंट्‌स, इंड्‌सइंड बॅंकस, एम अँड एम, बजाज ऑटो आणि आरआयएल यांच्या समभागात 2.97 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. 

काल सेन्सेक्‍स 770 अंशांनी तर निफ्टी 225 अंशांनी कोसळला होता. देशाच्या आर्थिक स्थितीच्या चिंतेमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी काल मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा केला होता. सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये मागील अकरा महिन्यांत एकाच दिवसात झालेली ही सर्वांत मोठी घसरण ठरली होती. 

मारुतीच्या समभागाला फटका 
वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुतीच्या समभागात आज 3.64 टक्‍क्‍यांची घसरण झाली. कंपनीने हरियानातील गुडगाव आणि मानेसर येथील प्रकल्पांमधील उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा फटका समभागांना बसला. 

जागतिक पातळीवर तेजीचे वारे 
हॉंगकॉंग, शांघाय, जपान आणि दक्षिण कोरिया येथील शेअर बाजारांमध्ये आज तेजीचे वारे होते. याचबरोबर युरोपीय देशांतील शेअर बाजारही आजच्या सत्रात सुरवातीला वधारल्याचे चित्र होते. 
 

loading image
go to top