शेअर बाजाराची गटांगळी  

पीटीआय
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

मुंबई - रुपयाचे अवमूल्यन, खनिज तेलाचे भडकलेले भाव आणि परकी भांडवलाचा बाहेर चाललेला ओघ यामुळे बुधवारी शेअर बाजाराने गटांगळी खाल्ली. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५५० अंश म्हणजेच १.५१ टक्‍क्‍याने कोसळून ३५ हजार ९७५ अंशांवर बंद झाला. मागील सत्रात निर्देशांकात २९९ अंशांची वाढ झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १५० अंश म्हणजेच १.३६ टक्के घसरण होऊन १९ हजार ८५८ अंशांवर बंद झाला. 

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक बुधवारी सुरू झाली आहे. यामुळे गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. या बैठकीत व्याजदरात पाव टक्का वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. याचबरोबर रुपयाने आज डॉलरच्या तुलनेत ७३ ची पातळी ओलांडली. याचाही परिणाम शेअर बाजारावर झाला. आशियायी आणि युरोपीय शेअर बाजारांमधील घसरणीचा फटका देशांतर्गत शेअर बाजाराला बसला. 

गुंतवणूकदारांच्या १.७९ लाख कोटींवर पाणी 
सेन्सेक्‍स आज ५५० अंशांनी कोसळल्याने सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १४५.४३ लाख कोटी रुपयांवरुन १४३.६४ लाख कोटी रुपयांवर आले. यामुळे गुंतवणूकदारांना १.७९ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३१ ऑगस्टपासून १५.७४ लाख कोटी रुपयांनी घटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Sinks Over 500 Points