
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याचे वृत्त जगभरात पोहोचताच शेअर बाजाराला सर्वांत आधी धक्का बसला आणि गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढण्यास सुरुवात केली.
मुंबई- सप्ताहाच्या आरंभी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. दिवसभरात ही घसरण वाढत गेली. पाहता पाहता सेन्सेक्स 2000 अंकानी कोसळला. मागील शुक्रवारी सेन्सेक्स 46,960 अंकावर बंद झाला होता. आज सकाळी बाजाराची सुरुवातच 28 अंकाच्या घसरणीने झाली. दिवसभराच्या व्यवसायात तो 2000 हून अधिक अंकाने घसरुन 44,923 अंकाच्या किमान स्तरावर पोहोचला.
निफ्टीमध्येही मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारी निफ्टी 13,760 अंकाच्या स्तरावर बंद झाला होता. आजच्या दिवसाची सुरुवात 19 अंकाच्या घसरणीने झाला. निफ्टीमध्ये दिवसभरात 630 हून अधिक अंकाची घसरण झाली. निफ्टी दिवसाच्या 13,131 स्तरावर पोहोचला.
हेही वाचा- कोरोनाच्या कडकीत स्टील कंपन्यांची चांदी; दरात केली दुप्पट वाढ
Sensex slides more than 1,516 points, currently trading at 45,444 points
Nifty falls more than 490 points, currently trading at 13,270 points pic.twitter.com/e9hQNGh8lQ
— ANI (@ANI) December 21, 2020
घसरणीचे कारण काय ?
हेही वाचा- रिलायन्स - फ्यूचर ग्रुपला दणका; उच्च न्यायालयाचा अॅमेझॉनच्या बाजूने निर्णय
शेअर बाजारात आलेल्या या वादळामागे पुन्हा एकदा कोरोनाचे कारण सांगितले जात आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याचे वृत्त जगभरात पोहोचताच शेअर बाजाराला सर्वांत आधी धक्का बसला आणि गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर थोड्यावेळाने बाजारात सुधारणा झाली. परंतु, घसरण मोठी आहे.