‘सेन्सेक्स’च्या घोडदौडीला लगाम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

आंतरराष्ट्रीय बाजार कमकुवत झाल्याने देशांतर्गत शेअर बाजाराच्या घोडदौडीला आज लगाम लागला. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ दोन्ही घसरणीवर बंद झाले. सेन्सेक्स बुधवारी १४४ अंशांच्या घसरणीसह ४५,९६० च्या पातळीवर बंद झाला, तर ‘निफ्टी’ ५१ अंशांच्या घसरणीसह १३,४७८ अंशांवर बंद झाला.

मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजार कमकुवत झाल्याने देशांतर्गत शेअर बाजाराच्या घोडदौडीला आज लगाम लागला. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ दोन्ही घसरणीवर बंद झाले. सेन्सेक्स बुधवारी १४४ अंशांच्या घसरणीसह ४५,९६० च्या पातळीवर बंद झाला, तर ‘निफ्टी’ ५१ अंशांच्या घसरणीसह १३,४७८ अंशांवर बंद झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सेन्सेक्स ३०’ च्या १९ शेअरमध्ये घसरण झाली. अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ‘टॉप लुझर्स’ ठरले. त्याचबरोबर नेस्ले इंडिया, आयटीसी, एचयूएल, कोटक बँक, टाटा स्टील आणि एलअँडटी या कंपन्यांचे ‘टॉप गेनर्स’ ठरल्या.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Stop Share Market Nifty