सेवाक्षेत्राची ऑगस्टमध्ये जोरदार घोडदौड ; नोकऱ्या वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 service sector growth in August survey revealed that jobs increased delhi

सेवाक्षेत्राची ऑगस्टमध्ये जोरदार घोडदौड ; नोकऱ्या वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर

नवी दिल्ली : सण-उत्सवाच्या काळाच्या आधी देशाच्या सेवा क्षेत्राने उत्तम वाढ साधल्याचे सांगितले जात आहे. एस अँड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑगस्टमध्ये ५७.२ इतका वाढला. ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त होती. सेवा क्षेत्रातील घडामोडी बघता ही वाढ ५५ पर्यंत राहील असे विविध रेटिंग एजेन्सींकडून सांगण्यात आले होते. जुलैमध्ये हा आकडा ५५.५ इतका होता. विशेष बाब म्हणजे पीएमआय ५० पेक्षा जास्त असल्याचा हा तेरावा महिना आहे.

नवे व्यवसाय सुरू झाल्यामुळे ऑगस्टमध्ये सेवा क्षेत्राची वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या क्षेत्रात नव्याने नोकरीचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्टमध्ये नोकरीच्या वाढीचे प्रमाण हे गेल्या चौदा वर्षात सर्वात जास्त असल्याचे एस अँड पीच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशाच्या जीडीपीमध्ये ५० टक्के योगदान हे सेवा क्षेत्राचे आहे, त्यामुळेही या क्षेत्रातील वाढ महत्वाची समजली जाते. कोरोनाच्या प्रसारामुळे या क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम झाला होता. एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सचे सहायक संचालक पोलिन्ना डी. लामा यांनी सांगितले की कोविडचा प्रसार कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. दुसऱ्या तिमाहीच्या मध्यात सेवा क्षेत्रात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या तेजीच्या जोरावर सेवा क्षेत्राने जुलैमध्ये पुनरागमन केले.

गती मंदावण्याची अर्थतज्ज्ञांकडून भीती

ऑगस्ट ते जून दरम्यान अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती वाढली. पण, काही अर्ततज्ज्ञांचे मत आहे की येणाऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची शक्यता आहे. वाढते कर्ज, महागाई आणि जागतिक मंदी यांचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Service Sector Growth In August Survey Revealed That Jobs Increased Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..