अर्थसंकल्पी आठवड्यात गमावले सात लाख कोटी

वृत्तसंस्था
Tuesday, 4 February 2020

 भारतीय शेअर बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण झाली होती. मागील आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४.५ टक्‍क्‍यांनी म्हणजे १,८७७.६६ अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ४.७९ टक्‍क्‍यांनी (५८६.४० अंशांनी) घसरला होता.

नवी दिल्ली - भारतीय शेअर बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण झाली होती. मागील आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४.५ टक्‍क्‍यांनी म्हणजे १,८७७.६६ अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ४.७९ टक्‍क्‍यांनी (५८६.४० अंशांनी) घसरला होता. त्यामुळे सरलेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांनी सुमारे ७ लाख कोटी रुपये गमावले आहेत. या कालावधीत ऑटो, बॅंक, वित्तीय सेवा, एफएमसीजी, धातू आणि तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली आहे. विविध क्षेत्रातील शेअरच्या किंमतीत ४ ते १२ टक्‍क्‍यांची घसरण झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून असलेल्या मोठ्या अपेक्षा, चीनमधून मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असलेला कोरोना विषाणू आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा नकारात्मक परिणाम या सर्वांचा फटका शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना बसला आहे. मुंबई शेअर बाजारातील ५०० पैकी ४२० कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. तर टॉप १०० कंपन्यांच्या शेअरमध्ये तर दोन आकडी घसरण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven lakh crore lost in the budget week