Share Market : 'हे' 3 शेअर्स देतील तगडा परतावा, तज्ज्ञांना विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market news

Share Market : 'हे' 3 शेअर्स देतील तगडा परतावा, तज्ज्ञांना विश्वास

Share Market मध्ये पैसे गुंतवून चांगला नफा मिळवायचा तुमचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शेअर मार्केट एक्सपर्ट याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करु शकतात. अशात आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक्सची लिस्ट आणली आहे. बँक निफ्टी इंडेक्सने सोमवारी लाइफ टाइम हाय लेव्हलला स्पर्श केला आहे. अशात तुम्ही योग्य आणि दर्जेदार शेअर्समध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे.

बँक ऑफ बडोदा, पीएनबी, युनियन बँक, साउथ बँक, फेडरल बँक हे सर्व चांगले शेअर्स असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, त्यांनी मुथूट फायनान्स आणि आयईएक्सच्या शेअर्समध्ये गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. इंडसइंडचेही शेअर्स चांगली कामगिरी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पण आता संजीव भसीन यांनी जे शेअर्स निवडले आहेत, त्यात एस्कॉर्ट्स कुबोटा फ्युचरमध्ये (Escorts Kubota fut) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. महिंद्राच्या तुलनेत हा शेअर आणखी वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.दुसऱ्या शेअरसाठी त्यांनी आयडीएफसी फर्स्ट बँक फ्युचरची (IDFC First bank Fut) निवड केली.

  • एस्कॉर्ट्स कुबोटा फ्युचर ( Escorts Kubota fut)

  • सीएमपी (CMP) - 1980 रुपये

  • टारगेट (Target) - 2050/2095 रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 1925 रुपये

आयडीएफसी फर्स्ट बँक फ्युचर (IDFC First bank Fut)

  • सीएमपी (CMP) - 57.95 रुपये

  • टारगेट (Target) - 60 रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 56.50 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share Market