Share Market: आज शेअर बाजाराचा मूड कसा असेल? कोणत्या 10 शेअर्सवर कराल आज फोकस?

आयटी, मेटल, रियल्टी, ऑइल अँड गॅस आणि कॅपिटल गुड्सने काल शेअर बाजारावर दबाव आणला.
share market
share marketSakal

Share Market, Best Stock to Buy Today: बाजार मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. आयटी, मेटल, रियल्टी, ऑइल अँड गॅस आणि कॅपिटल गुड्सने बाजारावर दबाव आणला. दुसरीकडे, बँकिंग शेअर्समधील खरेदीने बाजाराला दिवसाच्या नीचांकातून सावरण्यास मदत झाली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स (Sensex) 388.20 अंकांनी म्हणजेच 0.66 टक्क्यांनी घसरून 58,576.37 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 144.65 अंक अर्थात 0.82 टक्क्यांनी घसरून 17,530.30 वर बंद झाला.

बर्‍याच काळानंतर निफ्टी त्याच्या 10-दिवसांच्या SMA खाली बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. ब्रॉडर मार्केटमध्ये अजूनही कमजोरीची चिन्हे आहेत. आता निफ्टीने 17,620 वर ब्रेकआउट दिल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर निफ्टी 17620 च्या खाली घसरला, तर तो 17,400-17,350 च्या दिशेने जाताना पाहू शकतो असेही ते म्हणाले. निफ्टी 17620 च्या वर ट्रेड करताना दिसला तर तो 17,700 आणि 17,800 च्या दिशेने जाताना दिसेल. अशात बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.

share market
Share Market: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्स 334 तर निफ्टी 69 अंकांनी वधारला

आज बाजाराची स्थिती कशी असेल?

निफ्टीने 11 एप्रिल रोजी डेलीचार्टवर तयार केलेला इनसाईड बार पॅटर्न मोडल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. 20-डीएमएजवळ विक्रीचा दबाव कमी होताना दिसत आहे. अलीकडच्या किंचित घसरणीसह निर्देशांक त्याच्या अल्पकालीन कंसोलिडेशनच्या खालच्या टप्प्याच्या जवळ असल्याचे बाजाराची एकूण रचना सूचित करते. निफ्टीला 17,500-17,400 वर मोठा सपोर्ट दिसत आहे. यावरून निफ्टी पुन्हा एकदा वरच्या दिशेने 18000 च्या दिशेने जाताना दिसतो.

निफ्टीने 17,600 चा ट्रेड सपोर्ट मोडल्याचे कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल म्हणाले. निफ्टीने 17,420 ची पातळी मोडून काढल्यास शॉर्टटर्ममध्ये विक्रीचा हा दबाव वाढलेला दिसून येईल. वरच्या बाजूस, 17,600 वर रझिस्टंस आहे. निफ्टीने ही बाधा पार केल्यास शॉर्ट कव्हरिंग दिसू शकते.

share market
Paytm च्या शेअर्समध्ये 70 टक्के घसरण; सीईओ स्पष्टीकरण देत म्हणाले...

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

ऍक्सिस बँक (AXISBANK)

कोटक बँक (KOTAKBANK)

पॉवरग्रीड (POWERGRID)

आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

ऍस्ट्रल (ASTRAL)

बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

ए यु बँक (AUBANK)

व्होल्टास (VOLTAS)

एमआरएफ (MRF)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com