Stock to Buy: 'हे' मेटल शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये देतील दमदार परतावा

टाटा स्टील आणि वर्धमान स्पेशल स्टील्सचे शेअर्स 3 महिन्यांच्या कालावधीसाठी बेस्ट पर्याय असल्याचे तज्ञांचे मत आहे.
Share
ShareSakal media

Best Stocks to Buy: निफ्टी मेटल इंडेक्सने गेल्या 5 महिन्यांच्या कंसोलिडेशन रेंजमध्ये एक मोठा ब्रेकआउट पाहिल्याचे ICICI सिक्युरिटीचे म्हणणे आहे. निफ्टी मेटल इंडेक्सने त्याच्या 100 दिवसांच्या EMA जवळ हायर बेस तयार केला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीला भविष्यातही निफ्टी मेटल इंडेक्सची कामगिरी कायम राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच टाटा स्टील (Tata Steel) आणि वर्धमान स्पेशल स्टील्सचे (Vardhman Special Steel) शेअर्स 3 महिन्यांच्या कालावधीसाठी बेस्ट पर्याय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Share
Share Market: आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड, या 10 शेअर्सवर करा फोकस

सध्याच्या जियोपॉलिटिकल ताणामुळे आणि उत्पादन खर्चात वाढ झालीय, त्यामुळेच स्टीलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन देशांकडून होणारा पोलाद पुरवठा ठप्प झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीय पोलाद कंपन्यांना त्यांची निर्यात वाढवण्याची संधी आहे.

टाटा स्टीलच्या टाटा स्टील (Tata Steel) शेअर्समध्ये फॉलिंग चॅनलमधून ब्रेकआउट दिसत आहे. सध्या या शेअरमध्ये खरेदीच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. आता हा स्टॉक पुन्हा एकदा सप्टेंबर 2021 च्या 1460 रुपयांच्या उच्चांकाकडे जात असल्याचे ICICI सिक्युरिटी म्हणणे आहे.

Share
Share Market: शेअर बाजाराच्या गटांगळ्या; सेन्सेक्स 495 तर निफ्टी 150 अंकांनी घसरला

वर्धमान स्पेशल स्टीलच्या (Vardhman Special Steel) शेअरच्या किमतीने 52 वीक EMA वर हायर बेस तयार केल्याचे ICICI सिक्युरिटीचे म्हणणे आहे. सध्या, त्याचा रिस्क रिवॉर्ड खूप चांगला दिसत आहे आणि या स्टॉकमध्ये खरेदीच्या नवीन संधी आहेत. येत्या महिन्यात हा स्टॉक पुन्हा एकदा 292 रुपयांच्या ऑस टाईम हाय (All Time High) गाठू शकतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com