Share Market: शेअर मार्केटच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्समध्ये 150 अंकांची घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Latest Updates

Share Market: शेअर मार्केटच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्समध्ये 150 अंकांची घसरण

आठवड्याच्या सुरवतीपासून शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली होती. तर काल शेअर बाजारातींल अंकाने 60 हजारांचा टप्पा पार केला होता. पण आज शेअर मार्केटच्या सुरवातीला बाजार कोसळल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आज शेअर बाजारावर सर्वांच लक्ष लागलं आहे. शेअर बाजारात सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्समध्ये 150 अंकांची घसरण दिसून आली होती. तर, निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 56 अंकांच्या घसरणीसह 17,888.20 अंकांवर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्स 206 अंकांच्या घसरणीसह 60,053.71 अंकांवर व्यवहार करत होता. (Share Market Big fall in share market)

बुधवारी सलग सातव्या दिवशी बाजार तेजीत बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी 5 एप्रिलच्या वरच्या पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 418 अंकांनी वाढून 60260 वर बंद झाला आणि निफ्टी 119 वर चढून 17944 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 222 अंकांनी वाढून 39462 वर बंद झाला. तर मिडकॅप 147 अंकांनी वाढून 31,401 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

जागतिक बाजारपेठेतील वाढ, विशेषत: अमेरिकन बाजार आणि अनुकूल देशांतर्गत ट्रिगर्समुळे बाजारात तेजी दिसून आल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. परकीय गुंतवणूकदारांचे कमबॅक झाल्याने बाजारात चांगले वातावरण होते. विकली एक्सपायरीच्या दिवशी अर्थात आज बाजारात काहीशी अस्थिरता असू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

बजाज फायनान्स (BAJFINANCE)

भारती एअरटेल (BHARTIARTL)

झी एंटरटेनमेंट लिमिटेड (ZEEL)

ट्रेंट (TRENT)

एल अँड टी (LTTS)

हिंदूस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

डिक्सन (DIXON)