
Share Market: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 749 अंकांनी घसरला, तर निफ्टी 17,171.95 वर बंद
Share Market Updates: शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात सुरु झालेलं घसरणीचं सत्र दिवसभर सुरुच राहिले. गॅप डाऊन ओपनिंगनंतर शेअर बाजार कोसळला. दोन दिवसांच्या चांगल्या कामगिरीनंतर आज मात्र शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 749.14 अंकांनी अर्थात 1.29 टक्क्यांनी घसरून 57162.54 वर बंद झाला. तर निफ्टी 220.65 अंकांनी अर्थात 1.27 टक्क्यांनी घसरून 17,171.95 वर बंद झाला. दिवसअखेर निफ्टी 50 मधील फक्त 8 शेअर्स सकारात्मक ओपनिंग दिले तर 42 शेअर्सची सुरुवात घसरणीने झाली.
हेही वाचा: Share Market: बाजारात 2 दिवसांपासून तेजीचे वातावरण; आज कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?
तत्पूर्वी आज सकाळी दोन दिवसांच्या तेजीनंतर आज पुन्हा शेअराची सुरुवात बाजारात घसरणीने झाली. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दिलं. सेन्सेक्स 379 अंकांच्या घसरणीसह 57,531.95 वर सुरु झाला, तर निफ्टी 149.85 अंकांच्या घसरणीसह 17,242.75वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील फक्त 5 शेअर्स सकारात्मक ओपनिंग दिले तर 44 शेअर्सची सुरुवात घसरणीने झाली. एका शेअरमध्ये वाढ अथवा घट झाली नाही. HCLTECH, ONGC, COALINDIA, TATASTEEL, JSWSTEEL या पाच शेअर सकारात्मक ओपनिंग देऊ शकले.
हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 57,531.95वर सुरु, निफ्टी 170 अंकांनी घसरला
काल गुरूवारी बाजारात तेजी दिसून आली. हेवी वेट शेअर्ससोबतच सगळ्याच शेअर्स मध्ये गुरूवारी खरेदी दिसून आल्याने हा तेजीचा माहौल होता. दिवसा अंती सेन्सेक्स 874.18 अंकांनी अर्थात 1.53 टक्क्यांनी वाढून 57,911.68 वर बंद झाला. तर निफ्टी 256.05 अंकांनी म्हणजेच 1.49 टक्क्यांनी वाढून 17,392.60 वर बंद झाला.
Web Title: Share Market Closing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..