Share Market: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स 61,121 हजारांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sensex hits high

Share Market: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स 61,121 हजारांवर

शेअर बाजार दिवसभर जबरदस्त तेजीमध्ये होता. त्याचबरोबर सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या स्थितीत बंद झाला. सेन्सेक्स 786 अंकांच्या उसळीसह बंद झाला. आज, सेन्सेक्स 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 61,121 वर बंद झाला. निफ्टी 133 अंकांच्या उसळीसह 18,145 च्या पातळीवर बंद झाला.

शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीही 100 अंकांनी वाढून ट्रेड करत आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही अतिशय सकारात्मक वातावरण दिसून आले आहे. आज शेअर बाजारात सेन्सेक्स 344 अंकाच्या तेजीसह 61,083 वर सुरू झाला तर निफ्टी 108 अंकाच्या तेजीसह 18,120 वर सुरू झाला. आज सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात उत्साह, खरेदीचा जोर, सेन्सेक्स 60 हजारांच्या पार