Share Market Closing : शेअर बाजारात घसरण कायम, आयटीच्या 'या' मोठ्या शेअर्समध्ये घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Closing : शेअर बाजारात घसरण कायम, आयटीच्या 'या' मोठ्या शेअर्समध्ये घसरण

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. बुधवारीही शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सुरवातीच्या सत्रात सकारात्मता दिसून आली होती. बाजार तेजीसह उघडला होता मात्र तेजी फार वेळ टिकली नाही. दिवसभर बाजारात अस्थिरता दिसून आली अखेर आजही बाजार घसरणीसह बंद झाला.

आज सेन्सेक्स 147 अंकाच्या घसरणीसह 59,958 वर बंद झाला तर निफ्टी 37 अंकाच्या घसरणीसह17,858 वर बंद झाला. आज 25 घसरले असून 25 शेअर्स तेजीत आहे.

आज सुरवातीच्या सत्रात  सेन्सेक्स 60,083 अंकांच्या वाढीसह तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 17 अंकांच्या वाढीसह 17,912 अंकांवर उघडला होता. आज सकाळी बाजारात आयटी, ऑटो, एफएमसीजी, मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली होती तर बँकींग, एनर्जी सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

दिवसभर शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण होते त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम होती.

हेही वाचा: Share Market Opening : शेअर बाजारात घसरण सुरूच; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

या शेअर्समध्ये तेजी - SBILIFE, ULTRACEMCO, HCLTECH, CIPLA, BAJAJ-AUTO, HDFC, WIPRO, TCS BAJFINANCE

या शेअर्समध्ये घसरण -RELIANCE, AXISBANK, TATAMOTORS, KOTAKBANK, TATASTEEL, INDUSINDBK, HINDUNILVR

हेही वाचा: Best Stock : मल्टीबॅगर ठरलेला 'हा' शेअर विक्री करण्याचा शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला

बाजारावरील सततच्या दबावाचे सर्वात मोठे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवल काढून घेणे. गेल्या ट्रेडिंग सत्रातही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 3,208.15 कोटी रुपयांचे शेअर्स विकून भारतीय बाजारातून भांडवल काढून घेतले.

यूएस फेड अध्यक्षांच्या भाषणात चलनविषयक धोरणात काहीही नरमाई येण्याची चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे बाजारावर परिणाम झाला. सध्या बाजाराची दिशा स्पष्ट नाही.