Share Market: तब्बल 42 शेअर्समध्ये घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका

आज शेअर बाजारात तब्बल 42 शेअर्समध्ये घसरण दिसून आली
Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market News sakal

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य आजवरच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरल्याने त्याचा थेट परिणाम शेअर बाजारात आज दिसून आला. दिवसभरात शेअर बाजारात अस्थिरता होती आणि अखेर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.

सेन्सेक्स 508 अंकाच्या घसरणीसह 53,880 वर बंद झाला तर निफ्टी 157 अंकाच्या घसरणीसह 16,058 वर बंद झाला. आज शेअर बाजारात तब्बल 42 शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर BAJAJ-AUTO, COALINDIA, BAJFINANCE, ADANIPORTS, APOLLOHOSP सह फक्त 8 शेअर्स वर आले.

देशांतर्गत स्टॉक मार्केटमधून सतत विदेशी कंपन्यांचं बाहेर पडत आहेत तसेच अमधूनमधून डॉलरच्या विक्रीचं प्रमाण वाढल्यानं त्याचा परिणाम रुपयाच्या अवमुल्यनावर झाला आहे. यापार्श्वभूमीवर इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये आज रुपया 13 पैसे निचांकी पातळीवर खुला झाला. अर्थात रुपया डॉलरच्या तुलनेत 79.58 रुपयांपर्यंत घसरला आहे.

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 245 अंकांच्या घसरणीसह 54,148 वर सुरू झाला तर निफ्टी 97 अंकांच्या घसरणीसह 16,118 वर सुरू झाला. दिवसभर शेअर बाजारात प्रचंड मोठी अस्थिरता होती.

भारतातील जून महिन्यातील महागाईची आकडेवारी आज अर्थात 12 जुलै रोजी येणार आहे. मे महिन्यात ते 7.04 टक्के राहण्याची शक्यता आहे. यानंतर अमेरिकेतील महागाईचा डेटा 1 दिवसानंतर येणार आहे. मे महिन्याच्या 8.6 टक्क्यांपासून ते आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com