Share Market Closing : Sensex मध्ये 400 अंकाची तेजी, आयटी अन् बँकीग शेअर्समध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Closing : Sensex मध्ये 400 अंकाची तेजी, आयटी अन् बँकीग शेअर्समध्ये वाढ

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली होती. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजही शेअर बाजार तेजीसह सुरू झाला आणि तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 402 अंकाच्या तेजीसह 62,533 वर बंद झाला तर निफ्टी 110 अंकाच्या तेजीसह 18,608 वर बंद झाला. (share market closing update 13 December 2022 )

आज 34 शेअर्समध्ये तेजी तर 16 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. COALINDIA HINDUNILVR TATASTEEL MARUTI सारखे शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर आयटी आणि बँकीग शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

हेही वाचा: Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 105 अंकांच्या तेजीसह 62,190 अंकांवर सुरू झाला तर निफ्टी 25 अंकांच्या तेजीसह 18,518 अंकांवर सुरू झाला. सकाळच्या सत्रात 30 शेअर्स तेजीत होते.

सोमवारी सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्सची विक्री झाली. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 28 शेअर्समध्ये खरेदी झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी आठ शेअर्स वाढले होते.

हेही वाचा: Share Market : दिवाळखोर कंपनीची खरेदी ठरली खरेदीदारांच्या शेअर्समधील घसरणीचे कारण

सोमवारी सेन्सेक्स 51 अंकांनी घसरून 62131 वर बंद झाला होता. तर निफ्टी 18497 वर बंद झाला आहे. निफ्टी बँक 75 अंकांनी वाढून 43709 वर बंद झाला होता. त्याच वेळी, मिडकॅप 116 अंकांनी वाढून 32491 वर बंद झाला होता.

या आठवड्यातील यूएस फेडच्या बैठकीतील निर्णय आणि चलनवाढीच्या आकडेवारीपूर्वी गुंतवणूकदार बहुतेक साईडलाइन राहतील. यूएस फेडच्या बैठकीच्या निर्णयानंतरच बाजाराची दिशा स्पष्ट होईल .